Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आमदार अण्णा बनसोडे यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

आमदार अण्णा बनसोडे यांचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

suwarna gaware 06/11/2024
IMG-20241106-WA0015
Spread the love

पायाभूत सुविधा, घरे, मेट्रो, आरोग्य, पाणी, यासह विविध लोकोपयोगी योजना राबविण्याचा संकल्प जाहीर

पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी आपला सन 2024 ते 2019 या कार्यकाळात करावयाच्या कामांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे, आरोग्याच्या सुविधा, पाणीपुरवठा तसेच पायाभूत सुविधा आणि इतर विविध लोकोपयोगी योजना राबविण्याचा संकल्प आमदार अण्णा बनसोडे यांनी जाहीर केला आहे.

दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, उमेश चांदगुडे इरफान सय्यद माईकाटे चंद्रकांता सोनकांबळे सुजाता पालांडे नंदू कदम शितल हगवणे अमित गोरखे शेखर काटे संजय काटे राजू बनसोडे कविता अल्हाट ज्ञानेश्वर कांबळे अविनाश काटे कुणाल लांडगे, विशाल वाळुंजकर, आनंद ओव्हाळ, सुवर्णा कुटे, सरिता साने, तसेच आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश बहल म्हणाले, राष्ट्रवादीचा कर्तव्यपूर्ती आणि संकल्प अहवाल जाहीर झाला आहे. दापोडी मध्ये फिरंगाई देवीच्या आरतीने पदयात्रा झाली.

दापोडीचे मताधिक्य सर्वाधिक असायला हवे, त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.आमदार अमित गोरख म्हणाले, आमदार अण्णा बनसोडे यांनी 2024 ते 2019 या कार्यकाळासाठी बनवलेला संकल्प अहवाल सर्व मित्र पक्षांना विश्वासात घेऊन तयार केला आहे.

पुढील काळात हे सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”संपूर्ण पिंपरी मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारणार असून चाकण, तळवडे व हिंजवडी परिसर जोडणारा मेट्रोमार्ग उभारणे. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याच्या नियोजनासाठी पवना धरणाची उंची वाढवणे किंवा इतर पर्यायी व्यवस्था करणे. विधानसभा क्षेत्रातील सर्व झोपडपट्याचे पुनर्वसन करणे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वस्त घरे उपलब्ध करून देणे, असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शासकीय कार्यालये, पोलीस आयुक्तालय, पोलीस स्टेशन व पोलीस कॉलनी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अद्ययावत करणे. स्व. बाळासाहेब ठाकरे, वल्ल‌भनगर, एस.टी. स्टँडचा पुनर्विकास करणे. पिंपरी येथे माता रमाई स्मारक, निगडी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक, पिंपरी गावात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर थीम पार्क उभारणे, अशा कामांचा संकल्प पत्रात समावेश आहे.शहरात अंडर वॉटर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार आहे. जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत योजना सुरू करणे.

मतदारसंघातील पाच रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करणे. कोरोना काळात बंद झालेल्या लोकल फेऱ्या पुर्ववत सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. मतदारसंघातील सर्व उद्याने, महापालिका शाळा, रस्ते, पाणी पुरवठा, जलनिःसारण इत्यादी सुसज्ज व अद्यावत करणे. अपंग, निराधार, वृद्ध यांच्यासाठी शहरामध्ये मोफत होम स्टे, निवारा उपलब्ध करुन दिला जाणार आहे. मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभागनिहाय जनसंपर्क कार्यालय सुरू केले जाणार आहे. अण्णा बनसोडे 15 दिवसातून एक दिवस या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. तसेच जनसंपर्क कार्यालयात 24×7 टोल फ्री कॉल सेंटर सुरू केले जाणार आहे. दापोडी येथील विहारामध्ये ध्यानकेंद्र, स्पर्धापरिक्षा केंद्र, परीक्षा केंद्र अद्यावत करणे.

दापोडी येथील त्रिलोक बौद्ध विहारास आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात जेष्ठ नागरिक महासंघासाठी अद्यावत व सुसज्ज जेष्ठ नागरिक भवन उभारणार असल्याचे घोषणापत्रात नमूद आहे.स्वतंत्र मार्गदर्शन कक्ष स्थापन करून शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार योजना, मुद्रा योजना व विविध महामंडळाच्या योजनांमार्फत बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याचा मानस. संभाजीनगर व शाहूनगर परिसर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नियंत्रणात आणणे.

छत्रपती संभाजी उद्यानाच्या समोरील जागेत अद्यावत बस टर्मिनल व सुसज्ज पार्किंग तसेच प्रेक्षागृहाची उभारणी. संभाजीनगर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाची निर्मिती.हाफकिन संस्थेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र घरकुल योजनेची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. पवनानदी काठावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात येईल.महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वतंत्र व्यापार संकुलाची निर्मिती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 63
Tags: #आमदार अण्णा बनसोडे #पिंपरी Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: आपल्या विचाराचे सरकार राज्यात येण्यासाठी आपला उमेदवार निवडून यायलाच हवा – खासदार श्रीरंग बारणे
Next: अजित गव्हाणे यांच्यासोबत विजयाचा संकल्प घेऊन हजारो नागरिकांची पदयात्रा!

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.