Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पुनावळेचे नाव जागतिक नकाशावर‌ आणणार – शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

पुनावळेचे नाव जागतिक नकाशावर‌ आणणार – शंकर जगताप

suwarna gaware 30/10/2024
ac3e6c67-acf2-4a70-b81b-0d9985871c94
Spread the love

कचरा डेपोच्या लढ्याला यश मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आमदार अश्विनी जगताप यांचे आभार

शंकर जगताप यांना विधानसभेत पाठवण्याचा पुनावळे ग्रामस्थांचा निर्धार

चिंचवड, ३१ ऑक्टोबर – लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या माध्यमातून पुनावळे गावच्या विकासासाठी व गावातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या आमदार निधीमधून गावात अनेक विकासकामे वेगाने झाली. पुढील पिढीला आपल्या पुनावळे गावचा अभिमान वाटला पाहिजे, अशा पद्धतीने विकासाचा वेग वाढविण्यात येईल, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी दिली. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष  महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी प्रचारानिमित्त आज पुनावळे गावचा दौरा केला. यावेळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात नारळ वाढविण्यात आला. त्यानंतर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत शंकर जगताप बोलत होते.

याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, भाजप शहर उपाध्यक्ष राहुल काटे, हुशारआण्णा भुजबळ, रामचंद्र दर्शले, चंद्रकांत दर्शले, अशोक काटे, पोलीस पाटील दिलीप दर्शले, राहुल ढवळे, अजिंक्य गायकवाड, रामदास मदने, तानाजी शिंदे, शंकर गायकवाड, माऊली दर्शले, सुरेश भुजबळ, निवृत्ती भुजबळ, सचिन गायकवाड, अक्षय भुजबळ, चेअरमन पोपट पांढरे, संभाजी शिंदे, संतोष भुजबळ, संभाजी शिंदे, रोशन दर्शले, मंगेश भुजबळ, संभाजी भुजबळ, रोहिदास मदने, राहुल भुजबळ, विलास बोरग, महेंद्र कोयते, कैलास भुजबळ, चिंटू सिंग, दादा ढवळे, सदाशिव गायकवाड, निवृत्ती दर्शले, राजेश भुजबळ, धनंजय कोयते, दिगंबर कोयते, लक्ष्मण कोयते यांच्यासह पुनावळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, पुनावळे येथे नियोजित कचरा डेपोच्या प्रश्नासंदर्भात मागील १५ वर्षांपासून येथील रहिवाशांचा संघर्ष सुरू होता. लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊंनी हा कचरा डेपो प्रकल्प रद्द व्हावा यासाठी सातत्यपूर्ण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यासंदर्भात राज्य शासनही गंभीर होते. मात्र भाऊंचे अकाली दुःखद निधन झाले. त्यांच्यानंतर आमदार अश्विनीताईंनी या विषयासंदर्भात विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली.

अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले. आणि कचरा डेपोचा प्रकल्प रद्द झाला. विशेष म्हणजे या कचरा डेपोच्या जागी आमदार अश्विनीताईंनी ऑक्सिजन पार्क प्रकल्प उभारण्याची मागणी केली. त्यासंदर्भात यशस्वी पाठपुरावा केला. अखेर या प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. त्यासाठी खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे. या ऑक्सिजन पार्कमुळे पुनावळे गावच्या लौकिकात भर पडणार आहे.

त्याचबरोबर गावातील १२ मीटर आणि १८ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते, अंर्तगत रस्त्यांचे डांबरीकरण, पावसाळी पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्टॉर्म वॉटर लाईनची कामे, नागरिकांना रस्त्याने व्यवस्थित चालता यावे यासाठी पदपथ, सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीचे पोल, टी जंक्शन येथे वाहतूक बेटाची निर्मिती आणि सुशोभीकरणाची कामे ही सर्व विकासकामे आमदार स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या निधीतून आपण केली. तर राम मंदिर परिसरातील सभा मंडप बांधण्याच्या कामालाही मंजुरी मिळालेली आहे. तेही काम लवकरच चालू होईल. 

पुढील काळात गावातील कोणत्याही शेतकऱ्याचे अथवा ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेत पुनावळे गावाच्या विकासाचा आलेख असाच चढता राहील, यासाठी मी देखील स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीन, अशी ग्वाही शंकर जगताप यांनी ग्रामस्थांना दिली.

शंकरभाऊंच्या विकासाच्या संकल्पनेला पुनावळे ग्रामस्थांचीही साथ – चेतन भुजबळ

कचरा डेपोच्या संदर्भात मागील १५ वर्षांपासून पुनावळे ग्रामस्थांनी प्रचंड संघर्ष केला. कधी महामार्ग रोखला, कधी महापालिकेवर भव्य मोर्चे काढले, तर कधी उपोषणाचा मार्ग अवलंबला. तरीही हा प्रश्न मार्गी लागला नाही. मात्र स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या प्रयत्नांतून हा आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला. त्यांच्या या ऋणातून उतराई होण्याची वेळ आली आहे. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेदेखील काम करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे अशा काम करणाऱ्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवून त्यांच्या विकासाच्या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी आम्ही पुनावळे ग्रामस्थ सज्ज आहोत, अशा भावना चेतन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 57
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचा पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल
Next: राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक) सीओडी देहूरोडचा आमदार महेश लांडगे यांना पाठींबा

Related Stories

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 1

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 2

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 3

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 4

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 5

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.