


पिंपरी /मुंबई दि. १० – महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज श्रमिक भवन दादर मुंबई येथे घरेलू कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी प्रमुख पदाधिकारी यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी मुंबई, उपनगर, पिंपरी चिंचवड ,पुणे सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते.
घरेलु कामगारांना सामाजिक सुरक्षा,नवीन चार श्रम संहिता मुळे होणारे नुकसान, घरेलू कामगारांची स्थिती, घरेलू कामगारांना विमा योजना, घरेलू कामगार कामगार नोंदणी आदी विषयावर चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्न आणि मागण्या संदर्भात लवकरच कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे सोबत बैठक व कामगार मुख्य सचिव यांना भेटून चर्चा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांचे कार्यकर्ता परिषद लवकरच मुंबईत आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
