Skip to content
11/10/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा !’कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथे आंदोलन.
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा !’कष्टकरी संघर्ष महासंघाचे चिंचवड येथे आंदोलन.

suwarna gaware 28/09/2026
29abda8a-63e5-4e71-bc47-c6cf603fcedc
Spread the love

पिंपरी दि. २८ – केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाही विरोधी काम करत असून त्यांच्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झालेला आहे, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यात ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयावर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले आहेत, आयोगात सत्ताधाऱ्यांना मदतीचे निर्णय घेतले जात आहेत, यावरून कष्टकरी संघर्ष महासंघाने आज आंदोलन करत ‘निवडणूक आयोग वाचवा, लोकशाही वाचवा’ असे आंदोलन करण्यात आले व ज्ञानेश कुमार यांची यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, मनपा सदस्य सलीम डांगे,निरंजन लोखंडे, लाला राठोड, बालाजी लोखंडे, इरफान चौधरी,यासीन शेख, सुनील भोसले, सहदेव होनमने,ओमप्रकाश मोरया, सागर ठोंबरे, संतोष खोडवे,देवप्पा मिटकरी, गीतांजली सोनवणे, अरुणा सोनवणे,सविता कांबळे, अनिता कुंभार यांचेसह शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी नखाते म्हणाले की, निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावृत्ती एसआयआर च्या प्रक्रियेद्वारे पद्धतशीर मतदारांची नावे वगळण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला असून मतदार नोंदणी प्रक्रियेतील बदलांचा सर्वाधिक फटका मतदारांना व तरुणांना बसत आहे यात महत्त्वाचे काम ई – सिनेट सॉफ्टवेअर करत आहे.

महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीला आधार देत आणि आता तृणमूल काँग्रेसचे वाटोळे करण्यामध्ये निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा हात आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेने आवाज उठवण्याची गरज असून ज्ञानेश कुमार यांना हाकलून देण्यात यावे असे मतही नखाते यांनी व्यक्त केले.

एसआयआर च्या नावाखाली महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथून प्रत्येकी २ कोटी नावे वगळण्यात आले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ९० लाख लोकांना मतदानापासून वंचित ठेवले, दिल्लीमध्ये ४७ लाख, केरळमध्ये २४ लाख, तामिळनाडू ९७ लाख, कर्नाटकात १ कोटी, तेलंगणा मधून ७३ लाख मतदारांची नावे या मतदार यादीतून वगळण्यात आलेले आहेत हे लोकशाहीला घातक ठरत आहे असे एकूण १३ कोटी पेक्षा अधिक मतदारांना यातून वगळण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ३ विधानसभा मतदारसंघांमधून ६०८९२७ मतदार वगळले गेले आहेत यातील पात्र लाभार्थ्यांना निश्चित संधी मिळाली पाहिजे.

मतदानाचा महत्वाचा अधिकार काढून घेतला जात आहे. असा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचे संरक्षण, मतदार यादीतील पारदर्शकता आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांची हमी या मागण्यांसाठी आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


आंदोलनानंतर पिंपरी चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 12
Tags: #election #workers #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्राच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
Next: फेरीवाला कायदा अंमलबजावणीसाठी ताकदीने लढू –  शक्तिमान घोष

Related Stories

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न 08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae 1

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

10/10/2026
IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी Screenshot 2

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

09/10/2026
डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते 196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478 3

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

09/10/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश! 9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a 4

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

07/10/2026
शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका 3e6a2276-66ab-447a-a543-84ae885ef563 5

शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

06/10/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08d44cb4-ff47-4327-881d-fa0e840cc2ae
  • Daily Breaking News
  • Maharashtra

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न

suwarna gaware 10/10/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी

suwarna gaware 09/10/2026
196b2613-df7a-47c5-9ebe-f1c9de2ef478
  • Daily Breaking News

डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते

suwarna gaware 09/10/2026
9d14d634-5fa6-4f60-bd5d-23b3b19d3c5a
  • Daily Breaking News
  • Education

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!

suwarna gaware 07/10/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे घरेलु कामगारांची राज्यव्यापी बैठक संपन्न
  • IDTRS पुणे येथे व्यावसायिक वाहन चालक प्रशिक्षण ‘प्रोजेक्ट सारथी’ चा प्रमाणपत्र वितरण कायर्क्रम यशस्वी
  • डिजिटल युगातही टपाल कर्मचाऱ्यांची सेवा महत्त्वपूर्ण : काशिनाथ नखाते
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागरच्या आराध्या महोरचे राष्ट्रीय बोक्से स्पर्धेत घवघवीत यश!
  • शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.