


पिंपरी, दि. १०: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळा मोशी क्रमांक 107 मध्ये प्रसिद्ध बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी व प्रसिद्ध तबलावादक पंडित श्रीकांत भावे यांचा संगीत वाद्य वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला . दिल्ली, कोलकत्ता, मुंबई ,चेन्नई, पुणे, बेंगलोर हैदराबाद, नागपूर, पणजी, बडोदा आणि बेळगाव यासारख्या शहरांमध्ये संगीत महोत्सवात यांनी सादरीकरण केले.

प्रेक्षकांच्या प्रचंड अशी दाद मिळवली आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन, जपान, फ्रान्स, इंग्लंड ,जर्मनी, स्विझर्लंड, ऑस्ट्रेलिया ,अफगाणिस्तान आणि इतर देशात ज्यांनी बासरी वादनाच्या कलेचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाकडून संगीत अलंकार पदवी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला सुरमणी पुरस्काराने सन्मानित त्याचप्रमाणे अलीकडल्या काळात पंडित भीमसेन जोशी याही पुरस्काराने सन्मानित अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारे पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बासरी वादनाचा आनंद व संगीता विषयी असणारी आवड निर्माण केली.
संगीता विषयी अनेक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संगीताबद्दल जागृती निर्माण केली. सर्व विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचा अगदी मंत्रमुग्ध होऊन आस्वाद घेतला. शास्त्रीय संगीताबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण झाली. या कार्यक्रमाचे आयोजन स्पीक मॅके या संस्थेच्या माध्यमातून केले गेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ही संधी विद्यार्थिनींना दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यवेक्षिका सन्माननीय सुनीता गीते मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखाताई डांगे मॅडम स्पीक मॅके या संस्थेच्या जय लक्ष्मी गोपालदास अय्यंगर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष उपाध्ये सर उपस्थित होते.
सौ नलावडे मॅडम राऊत मॅडम माया लोखंडे मॅडम दिपाली कांबळे कुचेकर मॅडम संतोष गवारे सर श्री संतोष पन्हाळे सर उमेश सूर्यवंशी सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोमनाथ शिंदे सर यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखाताई डांगे मॅडम यांनी आलेल्या कलाकारांचा यथोचित सन्मान व आभार व्यक्त केले

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
