


रावेत प्राधिकरण, किवळे, मामुर्डी येथे मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे

पिंपरी, दि. १० : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये रावेत म्हस्के वस्ती,श्रीराम चौक,रावेत प्राधिकरण, गुरुद्वारा, किवळे व मामुर्डी या वेगाने विकसित होत असलेल्या भागांत गेल्या काही वर्षांत मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे भक्कम आणि विस्तीर्ण जाळे उभे राहिले आहे. या रस्ते विकासामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात दूर झाल्या असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.
हा विकास केवळ आणि केवळ माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.तसेच यावेळी सुद्धा ड गटाचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले ब गटाच्या जयश्री भोंडवे,क गटाच्या आशा भोंडवे,अ गटाच्या श्रेया तरस गायकवाड यांनी प्रभागातील आज पर्यंतच्या कामाच्या जोरावर आमचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
रावेत–किवळे–मामुर्डी : विकासाचा कणा ठरले रस्ते
पूर्वी रावेत, किवळे व मामुर्डी परिसरात अपुरे रस्ते, अरुंद मार्ग, खड्डे आणि वाढती वाहतूक यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेल्या रस्ते विकास प्रकल्पांमुळे आज या भागात उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. विशेषतः रावेत बीआरटी रस्ता ते म्हस्के वस्ती रस्ता तसेच मुकाई चौक ते रावेत चौक बीआरटी रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली असून सकाळ-संध्याकाळच्या गर्दीतून मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रभागात विकसित झालेले प्रमुख रस्ते….
प्रभाग क्रमांक १६ मध्ये खालील महत्त्वाचे रस्ते विकसित करण्यात आले आहेत –
मुकाई चौक ते भक्ती शक्ती बीआरटी रस्ता
रावेत सर्वे नंबर ७५ ते भोंडवे बाग
रावेत पोलीस स्टेशन समोरील रस्ता
सेक्टर ३२ मधील अंतर्गत रस्ते
ममेली चौक ते गुरुद्वारा स्मार्ट सिटी रस्ता
गुरुद्वारा ते इस्कॉन मंदिर रस्ता
पीसीसीओई कॉलेज, रावेत समोरील रस्ता,सेलेस्टीअल समोरील रस्ता,राजयोग कॉलनी पूल व रस्ता,डी. वाय. पाटील कॉलेज समोरील रस्ता,एस. बी. पाटील शाळेसमोरील रस्ता मामुर्डी ते वीरबाबा रस्ता
विठ्ठल हाइट्स रस्ता, किवळे
समीर लॉन्स ते मुकाई चौक
के विला रस्ता व मामुर्डी रस्ता
या सर्व रस्त्यांमुळे शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, व्यापारी संकुले आणि निवासी भाग यांना थेट जोडणी मिळाली असून आपत्कालीन सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन प्रवास अधिक सुलभ झाला आहे.
आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ नवीन सबवे ;सुरक्षिततेत मोठी वाढ
आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या प्रवासी संख्येमुळे रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे धोकादायक बनले होते. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आकुर्डी रेल्वे स्टेशन लगत नवीन सबवे तसेच बिजलीनगर सबवेची निर्मिती करण्यात आली. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासन व महापालिकेकडून या महत्त्वाच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली. सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक पादचारी मार्ग उपलब्ध झाल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विकासाबरोबर जीवनमानात सुधारणा रस्ते, सबवे आणि पूल यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे केवळ वाहतूकच नव्हे तर परिसरातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासालाही गती मिळाली आहे. नवीन गृहप्रकल्प, व्यापारी उपक्रम आणि शिक्षणसंस्था येथे स्थायिक होत असून रावेत, किवळे व मामुर्डी भागाचा चेहरामोहरा बदलत आहे.
नागरिकांच्या भावना नेहमीच लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सुखकर जीवन हेच माझे प्राधान्य आहे. दर्जेदार रस्ते सुविधा दिल्यामुळे आज नागरिक आरामदायी प्रवास अनुभवत आहेत. हीच माझ्या कामाची खरी पावती आहे, असे मत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी व्यक्त केले.प्रभाग क्रमांक १६ मधील हा सर्वांगीण रस्ते विकास आगामी काळातही परिसराच्या प्रगतीसाठी मजबूत पाया ठरणार असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
