


पुणे, ता. १६ डिसेंबर: येथील फर्ग्युसन महाविद्यालयात दिनांक १४ ते २१ डिसेंबर पर्यंत सुरू झालेल्या पुणे पुस्तक महोत्सव २०२५ या मधे महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीच्या वतीने सिंधी साहित्याची माहिती पुणे पिंपरी चिंचवडकरांना व्हावीम्हणून एक स्टाॅल केलेला आहे.

त्या मध्ये सिंधी साहित्यातील अनेक पुस्तके उपलब्ध करण्यात आली असून या स्टाॅल चे सुरुवात काल संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी चे पदाधिकारी मनोहर जेठवानी आणि प्राध्यापक जीवत केसवानी यांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी बोलताना मनोहर जेठवानी यांनी बोलताना सांगितले की सिंधी साहित्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा प्रयत्न आम्ही करत आहोत .
तसेच प्राध्यापक जीवत केसवानी यांनी बोलताना सांगितले सिंधी साहित्यातील सुप्रसिध्द लेखक त्यांनी केलेले सिंधी साहित्यातील संशोधन अशा विविध विषयांवरील पुस्तके आपण महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी च्या वतीने उपलब्ध केलेली असुन आपण या पुस्तक महोत्सवात सिंधी समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरूण तरूणी यांनी भेट देऊन आपले सिंधी साहित्याचा इतिहास जाणून घ्यावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
यावेळी दिल्ली येथील राष्ट्रीय सिंधी साहित्य अकादमी चे प्रतिनिधी म्हणून प्रदिप केसवानी उपस्थित होते तसेच हिरो मोटवानी, मनोहर वासवानी किशोर मेंघानी विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन मराठी भाषिक असुन सुद्धा सिंधी साहित्याचा अभ्यास करणार्या रेणुका टाक या उपस्थित होत्या तसेच पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीचंद नागरानी हंशींराम हरजानी, तुलसीदास तलरेजा,सुरिंदर मंघनानी, हिरालाल रिझवानी, आतम प्रकाश मताई, नंदू नारंग आदी मान्यवर उपस्थित होते

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
