


पिंपरी चिंचवड, ता. २४: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकसित केलेल्या निगडी वाहतूक नगरी ते मुकाई चौक या बीआरटी मार्गावर दिनांक २२/११/२०२५ पासून पीएमपीएमएलबसेसचे संचलन सुरू करणेत आलेले आहे. निगडी वाहतूक नगरी ते मुकाई चौक याबीआरटी मार्गावर संचलनात असणाऱ्या बसमार्गांचा तपशील खालील तक्त्यात नमूदकेलेला आहे.

| अ.क्र. | मार्ग क्रमांक | पासून पर्यंत | बस संख्या | डेपो |
| १ | ३०३ | निगडी ते आकुर्डी रेल्वे स्टेशन | ०३ | निगडी |
| २ | ३०३अ | निगडी ते गहुंजे | ०१ | निगडी |
| ३ | ३१९ | निगडी ते पिंपळेगुरव | ०२ | निगडी |
| ४ | ३७५ | निगडी ते इंटरनिटी कंपनी हिंजवडी फेज ३ | ०२ | माण |
| ५ | ३६५ | निगडी ते मुकाई चौक | ०२ | निगडी |
| ६ | ३६७ | भोसरी ते मुकाई चौक | ०६ | भोसरी |
| एकूण | १६ |
बीआरटी लेनमुळे प्रवाशांना जलद व सुलभ सेवा मिळते. प्रवासाला लागणारावेळ वाचावा तसेच वाहतूक कोंडी व अपघात टाळता यावेत या उद्देशानेपीएमपीएमएल बसेससाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांनी बीआरटी लेनविकसित केलेल्या आलेल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून निगडी वाहतूक नगरी ते मुकाई चौक दरम्यान बीआरटी मार्ग विकसित करण्यात आलेला असून मा. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी सदरच्या बीआरटी मार्गावर बस संचलन सुरू करणेबाबत परिवहन महामंडळास सूचित केले आहे. त्यास अनुसरून दिनांक २२/११/२०२५ रोजी पासून निगडी वाहतूक नगरी ते मुकाई चौक दरम्यान बीआरटी मार्गावर बसेसचेसंचलन सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. या बीआरटी मार्गावर जसजशी प्रवाशीसंख्या वाढेल तसतशी संचलनातील बसेसची संख्या देखील वाढविली जाईल.
—- मा. श्री. पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
निगडी वाहतूक नगरी ते मुकाई चौक दरम्यान विकसित करणेत आलेल्याबीआरटी मार्गावर उपरोक्त तक्त्यात नमूद केलेले बसमार्ग संचलनात राहणारअसून या बससेवेचा लाभ प्रवासी, नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार यांनी घ्यावा. तसेच बीआरटी मार्गातून कोणतीही खाजगी वाहने चालवू नयेत असेआवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन)
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
