Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

आमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!

suwarna gaware 11/11/2025
584f17a5-378e-43f1-ac16-99de98e0b8e4
Spread the love
  • शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश
  • निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदारांकडून “पत्ते ओपन” करायला सुरुवात!

पिंपरी, 11 नोव्हेंबर (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी आपले “पत्ते ओपन” करायला सुरुवात केली आहे.

एकीकडे भेटीगाठी, सोसायट्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देत असतानाच दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही केले जात आहेत. या माध्यमातून नुकताच शिवसेना उबाठा गटातील माजी नगरसेवक यांच्या पत्नीसह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा भाजप पक्ष प्रवेश मंगळवारी केला गेला.

भारतीय जनता पक्षाचे आमदार, पक्षाचे माजी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यावर भाजपाने मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सरसावलेले आहेत.

महापालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने शांत, संयमी आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या आमदार शंकर जगताप यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तीस लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील मतदारांसमोर भाजपने पिंपरी चिंचवड शहरासाठी पक्षाचा “ब्रँड फेस” म्हणून जगताप यांना निवडणुकीची कमान सोपवली आहे.

पक्षाने टाकलेली जबाबदारी सांभाळत आमदार जगताप यांनी आता आपले ‘पत्ते ओपन” करायला सुरुवात केली आहे. याच माध्यमातून बैठका, पदाधिकाऱ्यांची चर्चा, गृहनिर्माण संस्था तसेच सोसायट्यांमध्ये संवाद मेळावे आयोजित केले जात आहेत. यामध्ये नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करत त्यावर आमदारांकडून तोडगा काढला जात आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणजे इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.


उबाठा गटाला धक्का!

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची कमान सांभाळताच आमदार शंकर जगताप यांनी शिवसेना उबाठा गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी उपशहर संघटक रजनी रघुनाथ वाघ आणि शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १७ मधील आजी माजी पदाधिकारी तसेच भाजपचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.


यांनी केला पक्षप्रवेश!

सुरेखा वाघ, मंदाकिनी वाघ, सारिका बागुल, रवींद्र पाटील, वंदना पाटील, रमेश भदाणे, सुनंदा भदाणे, रमेश बिरारी, प्रदीप भदाणे ,रामेश्वर ईशी, नितीन पाटील ज्ञानेश्वर महाजन, विठोबा महाजन, पल्लवी वाघ, रवींद्र महाजन, नितीन महाजन, भाऊसाहेब महाजन, भाऊसाहेब पेंटर, प्रशांत अहिरे,युवराज अहिरे , आशा अहिरे, पूजा अहिरे, वाल्मीक पाटील, गायत्री पाटील, रवींद्र जगताप, आर के महाजन, योगेश माळी यांनी भाजपमध्ये शिवसेनेतून प्रवेश केला आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मेट्रो रस्त्यांचे प्रशस्त जाळे, सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय, नवनवीन प्रकल्प यामधून शहराचा कायापालट झालेला सर्व नागरिकांनी पाहिला आहे. येथील नागरिकांचा भाजपला पाठिंबा आहे. आगामी काळात शहर भाजपच्या माध्यमातून शहराचा विकास होणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांची मागणी, पदाधिकाऱ्यांचा आग्रह यातून शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.


भाजपने पिंपरी चिंचवड शहराच्या निवडणूक प्रमुख म्हणून शहराची जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यात येईल. नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. भाजपामध्ये येण्यास शहरातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार भाजपकडे आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक नक्कीच यशस्वी होणार आहे. या निवडणुकीत महापौर हा भाजपचाच असेल असा विश्वास आहे.

शंकर जगताप
निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर.


suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 58
Tags: #bjp #shankar jagtap #shivsena #ubatha #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) सर्व समावेशक जम्बो कार्यकारणी जाहीर..
Next: ‘टीआरआय’ विरोधात कोळी बांधवांचा एल्गार!

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.