


“दिवे लावून घर उजळतं, पण माणसांच्या हास्याने समाज उजळतो.”
दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकत्रतेचा उत्सव!

पिंपरी चिंचवड, ता. ३०: प्रभाग क्रमांक १२ मधील आपल्या सफाई कामगार, घंटागाडी कामगार, ड्रेनेज सफाई कर्मचारी, आशा सेविका, सर्व अंध नागरिकांना, आणि बचत गटाचे कॉर्डिनेटर व सहयोगिनीं महिलांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद वाटला.
हे सर्व जण आपल्या समाजाच्या उन्नतीचे निःशब्द शिल्पकार आहेत.
त्यांच्या मेहनतीमुळेच आपलं शहर उजळतं, आणि आपल्या परिसरात स्वच्छतेचा प्रकाश पसरतो.

या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दिवाळीच्या भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते हसू —
हीच आमच्यासाठी खरी ‘सोनेरी दिवाळी’!
दिवाळीच्या निमित्ताने रुपीनगर तळवडे येथिल स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट वस्तूचे वाटप करण्यात आले. आपल्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता राखून आरोग्यमय आणि प्रसन्न वातावरण कायम ठेवण्यासाठी सदोदित प्रयत्न करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मा. नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांच्या माध्यमातून या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद मनस्वी समाधान देणारा होता.
यावेळी रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष वसंत पतंगे सर, अध्यक्ष प्रभाकर चौधरी लक्ष्मण गुरसाळी, रमेशजी पाटोळे (कार्याध्यक्ष), कॅप्टन कदम साहेब, घारजाई ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, त्र्यंबक गायकवाड, सुदामराव शिंदे, बाबुराव लहाने काका, कोंडीबा भालेकर, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमेश शेठ भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, भाजपा पिंपरी चिंचवड शहर चिटणीस शिरीषभाऊ उतेकर, उद्योजक दीपकजी बोर्डे, अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन भाऊ वाघमोडे, रवी एकशिंगे, हनुमंत कलमोरगे, रामभाऊ शेठ भालेकर, ज्ञानेश्वर माऊली भालेकर, पंढरीनाथ भालेकर ,अनिलशेठ भालेकर, अमोल दादा भालेकर, दिगंबर भालेकर, राजाराम आप्पा भालेकर, सुनील भालेकर, सुनील आमने, बाळासाहेब तुपे, मधुकर भालेकर, संभाशेठ भालेकर, रविराज शेतसंधी, अरविंद (बप्पा)साळुंखे, महेशशेठ भालेकर, मंगेश नखाते, शरददादा गोपाळ भालेकर, अजितदादा संभाजी भालेकर, संतोषराव पवार, बबन चव्हाण, सागर चव्हाण, भाजपा निगडी-चिखली मंडळ अध्यक्ष रामदास कुटे, सोमनाथ मेमाणे, रामदास गवारे, रोहिदास भालेकर, सागर भालेकर, विजय थिटे, बबन भालेकर, शिवाजी बिटके, भानाशेठ भालेकर, के के भालेकर, शरद नारखेडे, सनी पवार, दत्तात्रय घोडके, भाजपा पिंपरी चिंचवड शहर महिला कोषाध्यक्ष अस्मिताताई भालेकर, पिंपरी चिंचवड शहर भाजपा शहर संघटिका शितलताई वर्णेकर, वैशालीताई भालेकर, मंगल ताई भालेकर, ह भ प संगीताताई भालेकर व इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचा आयोजन करण्यासाठी विलास आबुज, दत्ता चव्हाण, स्वप्निल वाघमारे, नारायण माळी, सचिन गायकवाड, दिग्विजय सवाई, कमलेश भालेकर, तुषार भालेकर, निलेश भालेकर, अभिषेक भालेकर, हर्षल भालेकर, सचिन भालेकर, संतोष निकाळजे, प्रदीप जैसवाल इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम खेडकर यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
