


पिंपरी चिंचवड, ता. १९: प्रियदर्शनी स्कूल, मोशी यांनी आपल्या सामाजिक जबाबदारीच्या (CSR) उपक्रमांतर्गत “एक मुठी अन्न” या उपक्रमाचा दुसऱ्या वर्षी यशस्वी अन्नदान अभियान आयोजित केले.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. आशा रेड्डी आणि सौ. रझिया लाखानी, ईपीटीए सदस्य तसेच विद्यार्थ्यांनी स्वामी समर्थ वृद्धाश्रम (चिखली), सावली निवारा (पिंपरी) आणि ब्लाइंड स्कूल (पांजरापोल) येथे भेट देऊन संकलित अन्नसामग्रीचे वितरण केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सहानुभूतीचे महत्त्व आणि समाजसेवेची गरज समजून घेतली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
