


पिंपरी चिंचवड, ता. २२: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने रविवार दि. २१.०९.२०२५ रोजी निगडी येथील कीर्ती विद्यालयात कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेत ५५ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यात मुंबईहून आणि पुणे जिल्ह्यातील दौंड येथील कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना क्रांती पोतदार यांनी महा. अंनिसची पंचसूत्री आणि संघटनेची रचना, कार्यप्रणाली, उपक्रम यांची माहिती दिली. ॲड. मनीषा महाजन यांनी जादूटोणा विरोधी तसेच जातपंचायत विरोधी कायद्यांची माहिती देऊन त्यांची आवश्यकता विषद केली. उत्तम जोगदंड यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर माहिती दिली.
दुपारच्या सत्रात प्रा. दिगंबर कटयारे यांनी विविध ‘चमत्कारांचे’ प्रयोग करून दाखवले आणि कार्यकर्त्यांकडून या प्रयोगांचा सराव करून घेतला. तसेच हे प्रकार म्हणजे चमत्कार नसून यामागे विज्ञान किंवा हातचलाखी कशी असते हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती पोतदार आणि जिल्हा सचिव मनोहर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनात शाखा सचिव ज्ञानेश महाजन, कार्याध्यक्ष विकास सूर्यवंशी, गंगाधर सत्वधर, गणेश तामचीकर, कृष्णा भिसे, संजय निकम यांनी मेहनत घेतली. जिल्हा कार्याध्यक्ष सम्यक वि. म., सचिव संजय बारी, शाखा अध्यक्ष डॉ. योगेश गाडेकर यांनी नियोजनावर देखरेख ठेवली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
