


• शैक्षणिक उत्कृष्टता, नाविन्यपूर्ण संशोधन आणि आरोग्यसेवेतील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल

• NIRF 2025 मध्ये वैद्यकीय संस्थांमध्ये भारत देशात १२वे स्थान
पुणे, १० सप्टेंबर २०२५ – डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ मध्ये देशातील वैद्यकीय संस्थांमध्ये प्रतिष्ठेचे १२वे स्थान मिळवून एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे संस्थेने आपले शैक्षणिक मानदंड उंचावणे, संशोधन क्षमता वाढवणे आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेतली गेली आहे. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि उच्च दर्जाचे शिक्षण देणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवेत उत्कृष्टतेचा ध्यास घेतल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे वैद्यकीय महाविद्यालय ठरलो आहोत, ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे.
गेल्या वर्षभरात, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांनी आपल्या शैक्षणिक आणि संशोधन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे. संस्थेने नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती सुरू केल्या, अत्याधुनिक संशोधन केंद्रे स्थापन केली, सहकार्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन दिले, रुग्णालयीन पायाभूत सुविधा उन्नत केल्या, आरोग्य सेवा विस्तारल्या आणि प्राध्यापकांच्या सततच्या व्यावसायिक प्रगतीसाठी गुंतवणूक केली.
या उपक्रमांमुळे संस्था वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेत जागतिक स्तरावरील गुणवत्ता पुरवण्यासाठी सक्षम झाली असून, शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधनातील नावीन्य आणि सर्वांगीण रुग्णसेवा या केंद्रबिंदूंमुळे भविष्यात आणखी उच्च NIRF रँकिंग मिळवण्यासाठी दृढपणे सज्ज आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे कुलपती मा.डॉ. पी. डी. पाटील, यांनी सांगितले, “NIRF रँकिंगमध्ये १२वे स्थान मिळणे हे वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवेतील आमच्या उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. या यशामागे आमच्या प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा व कठोर परिश्रम आहेत. हे आमच्या आरोग्य क्षेत्रातील भावी नेते घडवण्याच्या ध्येयाला अधिक बळकटी देते. आम्ही ज्ञानवृद्धी, नाविन्य आणि समाजसेवा यासाठी कायम कटिबद्ध आहोत.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे प्र-कुलगुरू मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, यांनी म्हणाले, “NIRF कडून मिळालेली ही दखल म्हणजे आमच्या संस्थेतील शैक्षणिक कठोरता, नाविन्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आम्ही आगामी काळातही शिक्षणातील उत्कृष्टता, जागतिक भागीदारी, परिणामकारक संशोधन आणि परिवर्तनकारी शिक्षणाचा अनुभव यावर भर देत राहू, जेणेकरून आमचे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राचा भविष्यातील चेहरा घडवू शकतील.”
या यशाबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार मा. डॉ. यशराज पी. पाटील, यांनी अभिमान व्यक्त केला. त्यांनी सांगितले, “डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने NIRF रँकिंगमध्ये १२वे स्थान मिळवले, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या यशामागे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे समर्पण, चिकाटी आणि एकत्रित प्रयत्न आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सर्वोत्तम मानदंड निर्माण करणे हेच आमचे ध्येय राहिले आहे, आणि या मान्यतेमुळे आमचा उत्कृष्टतेकडे जाणारा प्रवास आणखी बळकट झाला आहे.”
तसेच डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणेच्या अधिष्ठाता मा डॉ. रेखा आर्कोट, यांनी सांगितले, “आमची NIRF रँकिंग ही शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणे आणि संशोधनातील नाविन्य वाढवणे या आमच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि संशोधन क्षमता मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत.
या मान्यतेमुळे आमचे प्रयत्न अधिक दृढ झाले आहेत आणि आम्हाला पुढे आणखी उच्च पातळीवरील वैद्यकीय संस्था बनण्याची प्रेरणा मिळाली आहे, जेथे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यसेवा पुरवली जाईल.”

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
