


पिंपरी चिंचवड, ता. ९: अखिल सलमानी समाज विकास संस्था तर्फे जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी (स.अ.व.स) हजरत पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉ . कैलास कदम ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष धम्मराज साळवे ,सामाजिक कार्यकर्ते कासीम शेख व विविध पक्षांचे माननीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सर्व जुलूस कमेट्यांचे अध्यक्ष व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच बांधवांसाठी तबरुख व पाणी बॉटल वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

ईद मिलाद-उन-नबीचे महत्त्व : हा दिवस हजरत पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. पैगंबरांनी दिलेल्या मानवतेचा, समानतेचा, सत्य, शांतता आणि बंधुभावाचा संदेश समाजासाठी आजही मार्गदर्शक आहे. या उत्सवातून सलोखा, एकता आणि सद्भावना जोपासण्याचा संदेश दिला जातो.
या सोहळ्यात संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर शेख, सेक्रेटरी समद शेख, उप-सेक्रेटरी साजिद शेख, विभागीय अध्यक्ष रिजवान शेख (भोसरी), असलम शेख (हिंजवडी), इकराम शेख (डांगे चौक), हैदर अली शेख (गुरु पिंपळे), जलालुद्दीन शेख (पिंपरी), शकील शेख (निगडी), महमूद शेख (नेहरू नगर), आलम शेख (कालेवाडी) यांच्यासह सर्व पदाधिकारी, सभासद, दुकानदार व सलमानी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष नशीम हकीम सलमानी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “ईद-ए-मिलाद-उन-नबीचा खरा अर्थ म्हणजे समाजात ऐक्य, बंधुता, प्रेम व शांततेचा संदेश रुजवणे. पैगंबरांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणेच आपल्याला समानता, शिक्षण, नीतिमत्ता व सेवाभाव यांचा अवलंब करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमातून आपण सर्वांनी समाजातील एकोपा वृद्धिंगत करून भावी पिढ्यांना योग्य दिशा देण्याचा संकल्प करूया.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष नशीम हकीम सलमानी यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
