


पिंपरी चिंचवड, ता. ७: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काळेवाडी विभागाच्या वतीने आज गणपती विसर्जन निमित्त काळेवाडी विसर्जन घाट व ज्योतिबा गार्डन येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रावरील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी अग्निशामक दल विद्युत विभाग सफाई कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी बांधवांचा सामाजिक बांधिलकी जपत सर्व कर्मचारी वर्गांचा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले व या सर्व कर्मचाऱ्यांना चहापाण्याची सोय करण्यात आली.

डॉ रीचा नवघणे आरोग्य अधिकारी संजय गायकवाड विनोद जाधव दिनेश जांभळे विजय राठोड विद्युत विभागाचे मुख्य अभियंता देशमुख साहेब मेश्राम मॅडम प्रकाश तंबोरे अनिल सोनवणे नितीन सूर्यवंशी विशाल माने पोलीस अधिकारी एल एल जमादार साहेब पोलीस हवालदार धारणे साहेब संजय गायकवाड दीपक धोत्रे सचिन दगडे निलेश कांबळे मयूर देवरे गजानन चव्हाण अग्निशामक दलाचे संजय ऐकाळे अमोल कांबळे कीर्तिराज सोनकांबळे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा श्री धनाजी येळकर कोळी महासंघाचे अध्यक्ष डी एम कोळी प्रहार संघटनेचे संजय गायके सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ चंद्रकांत गायकवाड एकनाथ काटे राजेंद्र भरणे भरत शिंदे कृष्णा येळवे बाळासाहेब येडे दीपक भगत लक्ष्मण टोणपे प्रजाक नढे सिताराम जगताप मिलिंद कोंढरे सोनवणे मामा सौ शारदा चोक्सी जठार ताई उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते व सुजाता नखाते यांनी केले सूत्रसंचालन व आभार विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
