Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • उद्योगनगरीमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा मार्ग मोकळा!
  • Daily Breaking News
  • Education

उद्योगनगरीमध्ये ‘आयआयएम’ उभारणीचा मार्ग मोकळा!

suwarna gaware 03/09/2025
9735e0a8-d275-478a-8298-d02260da11dc
Spread the love

एज्युकेशन हब पिंपरी-चिंचवड : मोशीतील 70 एकर जागा निश्चितीचा GR प्रसिद्ध

पिंपरी- चिंचवड, ता. ३: पिंपरी-चिंचवडमध्ये आयआयएम उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मौजे मोशी, ता. हवेली, जि. पुणे येथील ग. नं. ३२७ (जुना ग.नं. ३२५) मधील ७७ हे. ०१ आर पैकी २८.०० हे. आर जमीन भारतीय प्रबंध संस्थान (IIM) नागपूर प्रशिक्षण आणि शिक्षण केंद्र उभारणे या प्रयोजनासाठी यांना प्रदान करण्यात आले. त्याचा अध्यादेश आज दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन-2020’ मध्ये ‘एज्युकेशन हब पिंपरी-चिंचवड’ असा संकल्प केला होता. त्यामध्ये आयआयएम आणि आयआयटी सारख्या संस्थांची केंद्र शहरात सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

‘आयआयएम’ नागपूरचे संचालक भीमराया मैत्री म्हणाले की, “पुणे हे एक प्रमुख उत्पादन व आयटी केंद्र आहे. आजच्या बदलत्या जगात कार्यकारी अधिकाऱ्यांना नव्याने कौशल्य मिळवून देणे आणि आधीच्या कौशल्यांचा पुनर्विकास करणे आवश्यक आहे. उद्योग आमच्याकडे येण्याऐवजी, आम्हीच त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या गरजा पूर्ण करत आहोत.”


सध्या आयआयएम नागपूर पुण्यात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी विकेंड एमबीए कार्यक्रम चालवते. जो मोशी कॅम्पस सुरू झाल्यावर तिथे स्थलांतरित केला जाईल. संस्थेचे गोवा, हैदराबाद आणि दक्षिण आशियाई देशांमध्येही विस्तार करण्याचे नियोजन आहे. पुण्यातील नव्या कॅम्पसमध्ये एक इनक्युबेशन सेंटर असणार आहे, तसेच उद्योगातील व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेले पार्ट-टाईम आणि विकेंड अभ्यासक्रमही असतील.



पुण्यातील कॅम्पस Data Science आणि Management मध्ये एक प्रमुख कार्यक्रम सुरू करणार आहे — हा कोणत्याही आयआयएमचा मुख्य कॅम्पसच्या बाहेर सुरू होणारा पहिलाच उपक्रम असेल. “चाकण, तळेगाव, भोसरी, रांजणगाव एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्क यांसारख्या औद्योगिक केंद्रांच्या जवळ असल्यामुळे मोशीची निवड करण्यात आली. आम्ही सात-आठ ठिकाणांचा विचार करून ही निवड केली आहे.

  • भीमराया मैत्री, संचालक, आयआयएम नागपूर.

प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवडमधील शैक्षणिक क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानास्पद आहे. उद्योगनगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि आता एज्युकेशन हब म्हणून शहराची ओळख निर्माण होते आहे. जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, संविधान भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आणि आता आयआयएम सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपले शहर शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 33
Tags: #iim #moshi #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: गणेश मूर्ती विसर्जन घाटावर स्वयंस्फूर्तीने सामाजिक संस्थांचे काम
Next: कामाचे तास वाढवून सरकारने कारखानदारांना शोषणाचा परवाना दिला – काशिनाथ नखाते

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.