


स्वातंत्र्य पर्वाचे अभ्यासक हेमदेव थापर
पिंपरी , ता. १६: भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२५ वार बुधवारी सायंकाळी सहा वाजता पिंपरी येथील बी टी अडवाणी धर्मशाळेत विभाजन विभिषिका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

या वेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापूसाहेब काटे यांनी सांगितले की विभाजन विभिषिकाहा दिवस म्हणजे आपल्या पुढे एक धडा आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्यातील हेवेदावे विसरून आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी जो आपला देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी एक ही सुट्टी न घेता सतत कार्यरत असतात त्या साठी आपण एकत्र राहून प्रयत्न केले पाहिजेत.त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून हेमदेव थापर उपस्थित होते.
या वेळी बोलताना त्यांनी १९४७ साली झालेल्या फाळणीचा इतिहास आपल्या भाषणातुन डोळ्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केला फाळणी चया आधी संपूर्ण भारतात ५४७ राजे होते ब्रिटीश सरकारने या राज्यांना त्यांनी वेगळा देश मागावा या साठी प्रयत्न केला पण ही मागणी त्या राजांनी मान्य केली नाही आणि एकिकडे काॅग्रेस चे नेते संपूर्ण देशाला सांगत होते की कुठल्याही परिस्थितीत देशाची फाळणी होऊ देणार नाही पण फाळणी तर झाली त्या वेळी १९४६ अखिल भारतीय मुस्लिम लिग ने डायरेक्ट ऍकशन डे जाहीर केला बंगाल मध्ये अत्याचार सुरू केले आणि दोन राष्ट्रे करा अशी मागणी केली एक मुस्लिम लोकांसाठी आणि एक हिंदू लोकांसाठी आणि नेमके हेच त्या वेळच्या ब्रिटिश सरकारचे राष्ट्राध्यक्ष चर्चिल यांचा हाच होरा होता आणि मग शेवटी १४ ऑगस्ट १९४७ देशाची फाळणी झाली आणि तरी सुद्धा देशातील मुस्लिम दुसऱ्या देशात जायला तयार नव्हते .
मग अखिल भारतीय मुस्लिम लिग चे नेते महंमद अली जिना यांनी पंतप्रधान पदाची इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छे ला महात्मा गांधी नी तयारी दाखवली पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला आणि महंमद अली जिना पाकिस्तान मध्ये गेले आणि त्याच फाळणी चया दिवसांपासून पाकिस्तान मधील हिंदूंची अत्याचार करुन कत्तल करण्यास सुरुवात झाली आणि त्या कत्तली मृत झालेल्या मृतदेहांची रेल्वे मध्ये ठेवून भारतात पाठवण्यास सुरुवात झाली त्यातून ही काही तेथील सिंध आणि पंजाब या प्रांतातील कट्टर हिंदू आणि शीख आपले जीव वाचवून भारतात आले पण त्यांना काॅग्रेस कडून कोणतीही मदत मिळत नसल्याचेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्षात आले आणि संघाने मदत केली
महत्वाचे म्हणजे २०१४ च्या आधी हा १४ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत नव्हता पण २०१४ साली देशाच्या सत्तेत बदल झाला आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर हिंदुत्ववादी नेते आदरणीय नरेंद्र जी मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली .
आणि विश्व गुरु नरेंद्र जी मोदी यांनी पहिल्यांदा १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका काळा दिवस म्हणून साजरा करावा असा निर्णय घेतला त्या मुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दर वर्षी हा दिवस विभाजन विभिषिका दिवस म्हणून साजरा करतात आणि देशातील राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.
या वर्षी चा हा दिवस भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी येथे साजरा करण्यात आला कारण फाळणी ची झळ ज्या नागरिकांना अधिक सहन करावी लागली असे सिंधी नागरिक मोठ्या प्रमाणावर येथे वास्तव्य करतात या वेळी हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रम संपूर्ण नियोजन भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोरेश्वर शेडगे यांनी केले .
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रमुख वक्ते हेमदेव थापर, माजी नगरसेवक संदीप वाघेरे,,राजु दुर्गे,शितल शिंदे, राजेश पिल्ले, केशव घोळवे माजी नगरसेविका ज्योतीका मलकानी, भाजपा पिंपरी दापोडी मंडल अध्यक्षा अनिता वाळूंजकर,सिंधी समाजातील प्रतिष्ठित आणि सामाजिक कार्यकर्ते धनराज आसवांनी, गोपीचंद आसवांनी, मनोहर जेठवानी,नरेश पंजाबी, सुरेश हेमनानी सुरिंदर मंघवानी, जितेंद्र अडवाणी मनीष पंजाबी उपस्थित होते .
या वेळी विषेश म्हणजे फाळणीणे खरी झळ अनुभवले गयानचंद असरानी सुनील केसवानी, भगवानदास खत्री, कन्हैयालाल आचरा,श्रीचंद नागरानी हे आवर्जून उपस्थित होते प्रतिनिधिक स्वरूपात ग्यानचंद असरानी यांचा सर्व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे विजय शिनकर, नंदू भोगले, कैलास सानप, नितीन अमृतकर, गणेश ढाकणे, गणेश वाळुंजकर आदी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
