


देशभक्तीपर गीतांनी व तिरंगामयी वातावरणात अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह

पुणे, दि.१६: हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) कंपनीमध्ये व एच.ए. शाळेमध्ये ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर प्रबोधनपर भाषण केले. कंपनीच्या यशस्वी वाटचालीची माहिती उपस्थित सर्वांना दिली.

यावेळी एचएएलचे सर्व कर्मचारी, एचएएमएसचे पदाधिकारी, एच.ए. ओ.ए चे पदाधिकारी, सुरक्षा विभाग, वितरण विभाग, अभियांत्रिकी विभाग, उत्पादन विभाग, वित्त विभाग, प्रबंधक निदेश कार्यालय, कार्मिक विभाग आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांनी सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेल्फी पॉइंटचा आनंद घेतला. सर्वांनी संविधानाचे वाचन केले. राष्ट्रगीतानंतर चहा पान कार्यक्रमाने सांगता झाली.


🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
