


पिंपरी चिंचवड , ता. १०: महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्या इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी आरूषी अशोक खेत्रे या विद्यार्थिनी जळगाव येथे झालेल्या 44 ते 46 किलो वजन गटात महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा ब्राझ पदकाची कामगिरी केली आहे.

कठोर परिश्रम मेहनत व जिद्दीच्या जोरावर आरोशीने हे साध्य केले. सर्वसामान्य कुटुंबात राहणारी आरुषी खेत्रे घरची परिस्थिती बेताची असताना बॉक्सिंग खेळामध्ये आवडीने सहभाग घेते तिने आजपर्यंत अनेक जिल्हा स्तरावरील खेळामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
आत्तापर्यत तिला एकुण 22 पदके मिळाली आहेत. निलेश फिटनेस कल्ब मोशीचे निलेश मेश्राम व मोशी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा डांगे मॅडम व वर्गशिक्षक श्री अमोल भालेकर सर श्री. सोमनाथ शिंदे अनेक स्पर्धांसाठी आरोशीला आर्थिक तसेच अनेक बाबतीमध्ये मदत करतात .या स्पर्धेला जाताना यावेळेस मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक यांनी आर्थिक मदत आरुषीला केली.
महानगरपालिकेतील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांमध्ये खेळाविषयी क्रीडा विषयी अनेक कौशल्य असतात पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे या मुलांना पुढे आर्थिक अडचणी जाणवतात त्या शाळा पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक करत असतात असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ डांगे मॅडम यांनी सांगितले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️