


🆘 परिवहन विभागाचा प्रतिवर्षी 560 करोड रुपयाचा घोटाळा ~ महिलांच्या सुरक्षिततेसोबत खेळ 🆘

पुणे, ता.१०: राज्यामध्ये अंदाजे आठ लाख कॅब्स आहेत. ओला उबेर रॅपिडोसारख्या वाहनांच्या माध्यमातून प्रवास करताना किंवा इतर वेळी कॅब मधून प्रवास करताना प्रत्येक प्रवासी SOS 🆘 बटन बघत असेल.
ते बटन आपत्कालीन स्थितीमध्ये प्रवाशांच्या विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी आहे. महिलांबरोबर चालत्या कॅब मध्ये गंभीर प्रकार घडल्याच्या घटना आपण यापूर्वी ऐकल्या आहेत. काही गुंड प्रवृत्तीचे लोक कॅबच्या माध्यमातून महिलांचे अपहरण करून विनयभंग केल्याच्या बातम्या अनेक वेळा छापून येतात. त्याच सोबत चालत्या प्रवासी वाहनांमध्ये विनयभंग करून महिलांचे खून सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
एखाद्या महिलेबरोबर कुठलाही गैरप्रकार घडल्यास आपत्कालीन स्थितीमध्ये पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्यासाठी ते 🆘 बटन असते.
आज सुद्धा आपण कुठल्याही कॅबमध्ये बसून ते बटन दाबल्यास कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही हे स्वतः चेक करू शकता. ते फक्त शो साठी आहे
ते बटन चालू असल्याचे खात्री केल्याशिवाय राज्यामधील एकाही कॅबची पासिंग होणे अशक्य आहे. कॅबची पासिंग होण्यासाठी ते बटन कार्यान्वैत आहे का नाही हे पासिंग करणाऱ्या ARTO ने चेक करणे बंधनकारक आहे.
परंतु राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त भरत कळस्कर साहेबांचे आदेशाप्रमाणे व परिवहन मंत्र्यांच्या कृपेने राज्यातील सर्व RTO ते बटन बंद असतानाच गाड्यांची पासिंग करत आहेत.
त्या मोबदल्यात त्यांची दरवर्षी 560 करोड हून जास्त रुपयांची कमाई या 🆘 रिचार्ज कंपन्यांकडून होत आहे.
राज्यात अंदाजे आठ लाख दरवर्षी पासिंग होणाऱ्या कॅब जर पकडल्या तर त्यांना 🆘 रिचार्ज सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रतिवर्षी सात हजार रुपयांचे रिचार्ज करावे लागते. ते रिचार्ज केल्यावर त्यांना बोगस सर्टिफिकेट या कंपन्यांकडून दिले जाते परंतु मुळात ते 🆘 बटन कधीच काम करत नाही. तसेच 2 – 3 वर्षांनी नवीन बटन घेण्यासाठी 12,000 रुपये खर्च करणे लाखो कॅब चालकांना बंधन कारक आहे.
तेच बोगस सर्टिफिकेट घेऊन, खरोखर ते बटन चालू आहे का नाही हे चेक न करता, 2 सेंटिमीटर जरी पिवळे रेडियम गाडीला कमी असेल तरी गाडी नापास करणारे RTO अधिकारी बिन बोभाट पणे महिलांची सुरक्षितता धोक्यात घालून, 🆘 बटन बंद असलेल्या सर्व गाड्यांना पासिंग करून देत आहेत.
याबाबत वेळोवेळी आम्ही राज्याचे परिवहन आयुक्त व अप्पर परिवहन आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून व निवेदने देऊन, आंदोलने करून सुद्धा आजतागायत त्यांनी याच्यावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही व लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात घालून कोट्यावधी रुपयांची कमाई राज्यातील सर्व आरटीओ अधिकारी संगनमताने करत आहेत.
डॉ. केशव नाना क्षीरसागर
अध्यक्ष : महाराष्ट्र कामगार सभा

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️