Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील पदोन्नतीने एकाच विभागात अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील पदोन्नतीने एकाच विभागात अनेक वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा

suwarna gaware 01/08/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
Spread the love


पिंपरी चिंचवड, ता. १: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एक कर्मचारी एका व्यक्तिकडून पैसे घेण्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहिती घेतली असता लेखा विभागातील सदर व्हिडिओ असून यामुळे महानगरपालिकेतील चुकीच्या कामाबाबत शहरात चर्चा सुरू आहे.

आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनेक पुरस्कार मिळाले. गतिमान आणि भ्रष्ट कारभार विरहित प्रशासन असा डंका आयुक्त यांच्या मार्फत वाजविण्यात आला. आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचे आश्वासन दिलेले होते.

प्रशासकीय राजवटीत अनेक चुकीच्या गोष्टी, वाढीव दराच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या यावर अनेकदा वर्तमानपत्रांनी आवाज उठवला पण काल पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील लेखा विभागातील पैसे घेण्याबाबत जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याने प्रशासकीय राजवटीत कसे चुकीचे काम होते ते अधोरेखित केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात अशा गोष्टी नेहमीच घडत असतात. मनपा चे काम करणाऱ्या ठेकेदारांची देयके काढण्याचे काम या विभागामार्फत केले जाते त्यामुळे येथे नेहमीच ठेकदार यांची वर्दळ असते. या विभागात विभाग प्रमुख , लिपिक , शिपाई तसेच कंत्राटी कर्मचारी हे अनेक वर्षापासून येथे कार्यरत असल्याने त्यांना कोणाचेही भय नाही आहे.

आपल्या लेखा विभागात पैसे घेऊन कामे केले जातात एकही बिल विना पैशाचे पास केले जात नाही शिपायापासून ते बिल मंजुरीचा चेक देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच चिरीमिरी पैसे घेतात आणि हे सगळं सगळ्यांना माहिती असून सगळे गप्प आहेत. कारण माहिती नाही का ? पण जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याने ह्याचा पुरावा जनतेसमोर आणला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी पैसे घेताना सरळ दिसत आहे असे असताना देखील २ दिवस होऊन सुद्धा विभाग प्रमुख यांच्याकडून सदर कर्मचारी याचा शोध लावून त्यावर कारवाई करण्यात आली नाही.

अथवा एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्त शेखर सिंह साहेब अथवा अती आयुक्त अथवा वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून सदर कर्मचारी अथवा विभाग प्रमुख यांना जाब विचारला जात नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.

सदर निवेदनाच्या माध्यमातुन एक करदाता नागरिक या नात्याने, जबाबदार प्रशासकीय अधिकारी असणारे आयुक्त श्री.शेखर सिंह साहेब आपणांस विनंती करण्यात येत आहे की , सदर व्हिडिओ यांची चौकशी करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने याचा खुलासा करण्यात यावा तसेच संबंधित कर्मचारी तसेच विभाग प्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि मुख्य म्हणजे लेखा विभागात अनेक वर्षापासून पदोन्नतीने एकाच पदावर , एकाच जागेवर अनेक अधिकारी, कर्मचारी काम करीत असल्याने येथे त्यांची मनमानी चालत आहे.

एकही बिल अथवा फाइल पैसे घेतल्या शिवाय पुढे जात नाही आहे. त्यामुळेच गैर व्यवहारचे असे प्रसंग घडत आहेत. शासकीय नियमानुसार एक अधिकारी अथवा कर्मचारी ३ वर्षाहून जास्त काळ एकच ठिकाणी कार्यरत राहू शकत नाही असा शासकीय नियम असताना मग पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात असे अनेक अधिकारी , कर्मचारी, लिपिक , शिपाई आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून येथेच काम करतात. काहीना पदोन्नती देऊन एकाच जागेवर ठेवण्यात आलेले आहे.

तर काही बदली केलेल्या कर्मचारी यांची बदली रद्द करून पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी पुन्हा रुजू करण्यात आले. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी , लिपिक, शिपाई हे येथेच अनेक वर्षापासून कायम कार्यरत असल्याने त्यांचे आणि ठेकदार यांचे आर्थिक हित संबंध तयार झाले आहे. विशेष बाब म्हणजे लेखा विभागातील महिला कर्मचारी सुध्दा आर्थिक देवाणघेवाण करतात.

अशा चुकीच्या प्रकारातून अशा घटना घडत आहे ज्या महानगरपालिका यांच्या नावाला बट्टा लावण्याचे काम करीत आहे. प्रशासकीय राजवटीत आयुक्त साहेब आपण जबाबदार प्रशासकीय अधिकारी असल्याने सदर प्रकरणाचे गांभीर्य आपण लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील पदोन्नतीने एकाच पदावर अनेक वर्षापासून काम करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्वरीत बदली करण्याचे आदेश द्यावेत आणि सदर व्हिडिओ यांची चौकशी करून त्यांच्यातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 162
Tags: #rahul kolhatkar #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महापालिकेतील ४७७६ पदे रिक्त – पिंपरी चिंचवड शहराच्या सेवांवर गंभीर परिणाम
Next: पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.