


- शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीचे स्वागत
- पिंपरीमध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत केला जल्लोष
पिंपरी १९ जुलै: शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली आहे. याची घोषणा मुंबईमध्ये झाल्यानंतर राज्यभरामध्ये कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पिंपरी येथे शुक्रवारी (दि 18 जुलै) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना पेढे भरवले. युतीचा जल्लोष केला आणि आगामी महापालिका निवडणुकीत ‘ एक दिलाने’ काम करण्याचा संकल्प सोडला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युती केली. ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये ‘ गेम चेंजर’ ठरेल असे म्हटले जात आहे.
पिंपरीतील कार्यकर्त्यांनी देखील या युतीचे स्वागत केले आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येत आनंद उत्सव साजरा केला यावेळी जल्लोष करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे देखील भरवले .
यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, चिंचवड संघटक सुनील पालकर, युवा सेना मावळ जिल्हाप्रमुख सायली साळवी, पिंपरी विधानसभा प्रमुख सुवर्णा तडसरे, चिंचवड विधानसभा प्रमुख प्रियंका चव्हाण, शारदा वाघमोडे , पिंपरी विधानसभा उपसंघटिका सुवर्ण कुटे, पिंपळे गुरव विभाग संघटिका पोर्णिमा आमराव, स्नेहा गायकवाड, संगीता गायकवाड, इंदू जाधव, तेजश्री ढोरे, अनिता शर्मा, सुनिता हरपळे, सुनंदा दासरे, अर्चना गुरव, सुनिता मुळक, शीला अनपन, तसलीम तांबोळी, कविता कोंडे देशमुख तसेच मुकुंद ओव्हाळ, प्रशांत कडलक, प्रकाश ताटे आदी उपस्थित होते.
शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भीमराव सुरवसे रिपब्लिकन सेना प्रवक्ता पीसीएमसी, मुकुंद रणदिवे महाराष्ट्र सदस्य रिपब्लिकन सेन, उषाताई वाघमारे अध्यक्ष महिला आघाडी, दिलीप पांढरकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख, संतोष सौंदणकर शिवसेना शहर संघटक चिंचवड विधानसभा, राजू गायकवाड शहराध्यक्ष पिं. चिं. मनपा, रमेश कांबळे पिंपरी चिंचवड शहर संघटक, विमल प्रधान शहर उपाध्यक्ष महिला आघाडी, सुमन जैस्वाल अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, सुवर्णा तडसरे पिंपरी विधानसभा प्रमुख, सुवर्णा कुटे पिंपरी विधानसभा संघटिका, शारदा वाघमोडे चिंचवड विधानसभा प्रमुख, पोर्णिमा आमराव पिंपळे गुरव विभाग संघटिका, छाया क्षीरसागर महिला शाखा अध्यक्ष निगडी, सायली साळवी युवा सेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा, अर्चना गुरव चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष, प्रियंका सुरेश चव्हाण चिंचवड विधानसभा अध्यक्ष, सुनील तात्या पालकर शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक, रवींद्र दिलीप शेलार उपशहराध्यक्ष युवासेना, हेमचंद्र जावळे शिवसेना शहर समन्वयक, भरत वाघमारे, अजिंक्य उबाळे युवा सेना पुणे जिल्हाध्यक्ष, संतोष भोसले, सुहास तळेकर, अनिकेत येरुणकर, विशाल कोतवाल, शुद्धधन भालेराव, अमित शिंदे, अभिषेक सुरवसे, किशोर शिंदे, शुभम महाडिक, निलेश हाके, स्नेह गायकवाड, संगीता गायकवाड, इंदू आखव, तेजश्री ढोरे, अनिता शर्मा, सुनंदा पासरे, सुनिता हरपळे, अर्चना गुरव आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन सेने तर्फे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शहराध्यक्ष राजू गायकवाड, संघटक रमेश कांबळे, भरत वाघमारे, मुकुंद रंधवे, भीमराव सुरवसे हे उपस्थित होते.
युवा सेना शिरूर लोकसभा अध्यक्ष अजिंक्य उबाळे, तसेच संतोष भोसले, सुहास तळेकर, अनिकेत येलूरकर, विशाल कोतवाल, शुद्धोधन भालेराव, अमित शिंदे, अभिषेक सुरवसे, किशोर शिंदे, शुभम महाडिक, निलेश हाके यांनी देखील कार्यकर्त्यांना पेढे भरवले. शिवशक्ती भीमशक्तीचा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला.
शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन चालणारी शिवसेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्यकर्ते एक दिलाने काम करतील. या माध्यमातून भविष्यात राज्यामध्ये शिवशक्ती भीमशक्तीची लाट पाहायला मिळेल.
……….

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️