


पिंपरी चिंचवड, ता. ११: स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर अर्बन कंपनी सारख्या एप्लीकेशन वर काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, “महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट”, लागू करण्याची मागणी करणार

देशातील कोणतेच कायदे न पाळता रिक्षा, कॅब, बाईक टॅक्सी व आता काल परिवहन विभागाच्या पत्रानुसार (सोबत जोडले आहे) बस सुद्धा बेकायदा चालवणाऱ्या ओला, उबर व रॅपिडो विरोधात कारवाई चे कागदोपत्री आदेश काढण्याशिवाय परिवहन विभाग काहीही करत नाही.
परिवहन मंत्र्यांना रॅपिडो बाईक टॅक्सी बंद असल्याचे परिवहन विभागाचे अधिकारी कळवतात, परंतु परिवहन मंत्री मंत्रालया खाली रॅपिडो बाईट टॅक्सी चालकाला रंग हात पकडतात (सोबत स्क्रीन शॉट ) व त्यानंतर सुद्धा रॅपिडोची बाईक टॅक्सी बिनधास्त चालू असते.
शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सर्च प्राईसिंग द्वारे नागरिकांची व इतर वेळी प्रवाशांची लूटमार या कंपन्यांकडून अव्यहातपणे चालू असताना आज तागायात सदर कंपनीला एक रुपयाचाही दंड लागलेला नाही.
चालकांनी मागणी न करता ओला उबेर वर दुप्पट भाडे घेऊ शकता असा अजब नियम केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने काढला, तो सुद्धा फक्त या बेकायदा कंपन्यांच्या फायद्यासाठीच.
आम्हाला दुप्पट भाडे नकोच, ही रिक्षा व कॅब चालकांची मागणी आहे.
शहरे ट्रॅफिक जाम ने तुंबलेली असताना, नवीन रिक्षा परमिट वर बंदी आणण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त केंद्रीय वाहतूक विभागाकडे बोट दाखवतात व केंद्र राज्याकडे बोट दाखवते, असा खेळ गेले सहा वर्ष चालू आहे. या खेळामध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान तर रिक्षा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचा फायदा होत आहे.
या व इतर अनेक मागण्यांसाठी राज्यातील ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो वर काम करणारे हजारो कामगार संपूर्ण महाराष्ट्रातून आझाद मैदान मुंबईकडे कूच करणार आहेत. विशेषता पुणे आणि पिंपरी चिंचवड हून हजारो गिग वर्कर्स कॅब ने आझाद मैदान मुंबईला आंदोलनासाठी सकाळी सात वाजता निघणार आहेत.
– डॉ. केशव नाना क्षीरसागर
अध्यक्ष : भारतीय गिग कामगार मंच/ बघतोय रिक्षावाला/ IGF कॅब्स

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️