


पिंपरी चिंचवड, ता. २६: महिला सशक्तीकरणासाठी एक पाऊल पुढे ! या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी पुढाकार घेतला आहे. परिसरातील महिलांच्या आऱोग्यासाठी विविध प्रकारचे शिबिर आणि सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहणे आवडते.

स्वतःच्या कर्तत्वाने चार पैसे कमवावे असे अऩेकींचे स्वप्न असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. अऩ्यथा अनेक महिला छोटे-मोठे व्यवसाय सुरु करतात आणि ते बंद ही होतात.
योग्य निर्णय आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व्यवसायात यशस्वी व्हायला वेळ लागत नाही. व्यवसाय सुरु करताना काय केले पाहिजे, कुठला व्यवसाय निवडला पाहिजे, डिजिटल मार्केटींग कसे केले पाहिजे, इथपासून मार्केट कसे शिकायचे इथपर्यंत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन महिलांना देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये रूचकर आणि पौष्टीक खाद्यपदार्थ, मोदक आणि विविध प्रकारचे केक याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
कुटूंबांची जबाबदारी सांभाळताना महिला सर्वप्रथम स्वतःच्या आऱोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ज्यामध्ये कर्करोग तपासणी, डोळे तपासणी इतर आरोग्य तपासणी करण्यात आल्या. तसेच आरोग्याबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
महिला सशक्तीकरणासाठी एक पाऊल पुढे! हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित असून, माझ्या परिसरातील महिलांसाठी हा उपक्रम आपण घेतला आहे. महिला सक्षमीकरण कार्यशाळा ही स्त्रियांचे हक्क, आत्मविश्वास आणि नेतृत्वक्षमतेला नवी दिशा देणारे हे मार्गदर्शन सत्र अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असणार आहे. तसेच आरोग्याबाबत जनजागृती आणि काळजी, तपासणी शिबिर घेण्यात आले. या उपक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️