


पिंपरी चिंचवड, ता. २४: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संविधान पुस्तक दिंडी सोहळा संपन्न झाला. त्यावेळी स्व राजीव गांधी प्रतिष्ठान पिपरी चिंचवड शहराच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० अमृत महोत्सवी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज यांचे हरीपाठ व संविधान सुवर्ण महोत्सवी प्रित्यर्थ भवानी पेठ, पुणे या ठिकाणी संविधान वाटप २३ जून रोजी मोफत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी नसरीन तांबोळी, शितल बंडगर, अंकुश गायकवाड, उषा कांबळे, अनिता दहिकांबळे, दिलावर सय्यद, संदेश नवले. राहुल राऊत, कृष्ण शिंदे, मारूती कदम, संकेत गायकवाड आदी उपस्थित होते.
संविधान पुस्तक प्रचार व प्रसार झाला पाहिजे, हा शुद्ध हेतू या कार्यक्रमाचा होता. यामध्ये विविध संस्थांनी सहभाग घेतला आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️