


जाधववाडी ल पा तलाव

दि. 19/06/2025,वेळ :-9.00 A.M.
पुणे, दि. १९: सर्वांना याद्वारे कळविण्यात येते की, जाधववाडी ल पा तलाव 94.53% इतका भरलेला आहे. सदर तलाव हा “द्वारविरहित” -Ungated आहे. सद्यस्थितीचा पाऊस व धरणातील येवा वाढल्यामुळे सुधा नदी (इंद्रायणी नदी) पात्रात कोणत्याही क्षणी जाधववाडी ल.पा. तलाव 100% भरून अनियंत्रित विसर्ग चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू – आळंदी ते तुळापूर पर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना नदीपात्रालगत जाऊ नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
विशेषतः पायी दिंडी सोहळ्याच्या अनुषंगाने देहू आळंदी येथे आलेल्या भाविक वारकरी यांना नदीपात्रामध्ये न जाण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायत, नगर पालिका व महापालिका यांना इंद्रायणी नदी अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. असे दिगंबर डुबल, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग पुणे यांनी कळविले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️