


सुहृद मंडळ संचलित चिंचवड बधिर मूक विद्यालय, प्राधिकरण येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रथम दिनी शाळेच्या प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे ढोल, ताशा वाजवून, औक्षण करून व फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले.

याशिवाय सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, टोपी, वह्या, क्रेऑन्स व पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या सह्या यासाठी लावण्यात आलेल्या बोर्डवर केल्या.
विद्यार्थ्यांचा सेल्फी पॉइंट वर शिक्षकांनी काढलेला फोटो पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती उमा तारू यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पल्लवी पिंपळे सामाजिक कार्यकर्ता श्री गणेश टिळेकर श्री जीवन देशमुख श्रीमती स्नेहल झांबरे श्री समीर गायकवाड यांनी पाहिले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️