


पिंपरी चिंचवड, ता. १७(टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड): शहरातील शाळा सोमवार पासून सुरू झाल्या आहेत.मात्र अनेक स्कूल बस चालकांकडे बसचे फिटनेस प्रमाणपत्र नाही. स्पीड गव्हर्नरचा तांत्रिक तिढा निर्माण झाल्याने अनेक बस फिटनेस शिवाय आहेत.त्यामुळे बस चालक अडचणीत आहेत. वाहतूक.विभागाच्या नियमानुसार २०११ मध्ये स्कूल बस नियमावली मध्ये वाहनांचा वेग हा ताशी ४० की.मी. प्रति तास असा ठेवण्यात आला. त्यानुसार सर्व वाहनांमध्ये स्पीड गव्हर्नर बसवून देण्यात आला.परंतु आता ते स्पीड गव्हर्नर न वापरता नवीन सोळा अंकी नंबर असलेले गव्हर्नर बसविण्यात सांगितले आहे.

या आदेशा विरोधात अखिल महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघ आणि इतर विद्यार्थी वाहतूक संघटना यांनी मां.परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त यांच्याबरोबर ८ मे रोजी मीटिंग घेऊन समस्या मांडल्या. त्यात ज्या वाहनांचे स्पीड गवर्नर चालू आहेत की जे पूर्वी चार अंकी होते.ते चालू स्थितीत असतील तर तेच गव्हर्नर ज्या कंपनी ने ते बसविले आहेत त्यांना ते सोळा अंकी करण्यास सांगितले आहे.परंतु स्पीड गव्हर्नर कंपन्या ते करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
स्पीड गव्हर्नर कंपन्या ही जबाबदारी आर. टी. ओ.वर ढकलत आहेत.परंतु परिवहन विभागाने जी.आर. काढून.सुद्धा कंपन्या तोच स्पीड गव्हर्नर चालू करण्यास नकार देत आहेत. जो पर्यंत स्पीड गव्हर्नर सोळा अंकी होत नाही तो पर्यंत वाहन प्रणालीला जोडता येत नाही. वरील कारणामुळे स्कूल बस चे पासिंग थांबले आहे. वाहनाचा कर,विमा इत्यादी सर्व अटी पूर्ण करून सुद्धा फक्त पासिंग साठी परिवहन विभागाकडून तारीख मिळत नाही.
आर.टी. ओ. आणि स्पीड गव्हर्नर कंपन्या यांच्यातील.तिढा सुटत नाही तो पर्यंत वाहने पासिंग कशी करायची ? या विवंचनेत वाहन चालक आहेत.
शाळा.सुरू झाल्यानंतर वाहतूक विभागा कडून वाहनांची तपासणी सुरू होईल आणि विनाकारण दंडात्मक कारवाई करण्यात येईल.या मध्ये वाहन चालकांचा दोष काय.?
वरील.संदर्भात आर. टी. ओ.चे .अधिकारी यांची भेट घेऊन अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.तसेच ज्या वाहनांचे कागद पत्रे पूर्ण असून फक्त स्पीड गव्हर्नर मुळे पासिंग थांबले असेल तर त्या वाहनावर कारवाई करू नये अशी विनंती करण्यात आली.
– मोहन जाधव, उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ पिंपरी चिंचवड.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
