


पिंपरी, दि. १६: आज सोमवार दिनांक 16जुन 2025 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सावित्रीबाई फुले कन्या शाळा मोशी क्रमांक 107 मध्ये सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षांमध्ये नवागतांचे स्वागत प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेतून मनपाच्या प्रत्येक शाळेवर अ श्रेणीय अधिकारी प्रमुख म्हणून नेमले होते. मोशी शाळेत श्री. महेश वाघमोडे साहेब( सहाय्यक आयुक्त) उपस्थित होते. सुरुवातीला लेझीम वाद्याच्या गजरामध्ये नवागत विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बालगीतांच्या तालावर शाळेमध्ये आनंदी चैतन्यमय वातावरण निर्माण केलं होते.
इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल म्हणून पावलांचे ठसे कागदावर घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा डांगे मॅडम यांनी केले. नवागत विद्यार्थ्यांना औक्षवंत करून खाऊ देण्यात आला. श्री महेश वाघमोडे साहेब( सहाय्यक आयुक्त) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना डीबीटी अंतर्गत महानगरपालिकेकडून देण्यात येणारे शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात आले. शाळेमध्ये आलेल्या मुलांचा माझा शाळेतील पहिला दिवस स्मरणीय राहावा यासाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. यावर सर्व विद्यार्थी व पालकांनी आपले सेल्फी काढून शाळेतील पहिल्या दिवसातील आनंद व्यक्त केला.
बालवाडी शिक्षकांनी अनेक शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवले होते. यादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या सौ वंदनाताई अल्हाट यांनी अवांतर वाचनाची 100 पुस्तके शाळेत भेट दिली. या कार्यक्रमासाठी माजी नगर सदस्या सौ मंदाताई अल्हाट, शिव योद्धा ग्रुपचे संस्थापक श्री गणेश भाऊ सस्ते, श्री अभिमान भोसले (अभियंता) श्री. दत्तात्रय अल्हाट ,श्री हिरामण शेठ अल्हाट, सौ संगीताताई सस्ते, सौ हिंगे मॅडम ,सौ मातेरे मॅडम (माजी मुख्याध्यापिका) पल्लवी मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किरण खाटपे व सर्व सदस्य व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन सायली शिंदे, सारिका राऊत ,सौ सावरकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोमनाथ शिंदे सर यांनी केले. व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा डांगे मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
