


पिंपरी, दि. २६: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे वाढलेल्या लोकसंख्येमुळे अनधिकृत बांधकामांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणावर वाढली. या बांधकामावर तत्कालीन शासन निर्णयानुसार मालमत्ता करांवर शास्ती रकमेची कार्यवाही करण्यात येत होती.

सदर शास्ती हि महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 267अ’ मधील तरतूदीप्रमाणे दि. ४ जानेवारी २००८ रोजी शासन आदेशानुसार करण्यात येत होती. सदर असणारा शास्तीसह कर हा खूप मोठ्या प्रमाणावर होता. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने शासन निणर्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व अवैध बांधकामांना देय असलेला शास्तीकर दिनांक ३ मार्च २०२३ रोजी शासन आदेशान्वये माफ करण्यात आला.
परंतू या सर्व कार्यवाहीमूळे ज्या लोकांनी शास्ती करासहीत नियमित कर (मालमत्ता) भरला होता अशा लोकांचा अगावू कर महानगरपालिकेकडे जमा झाला आहे. अशा नागरीकांसाठी महानगरपालिका कर आकारणी विभागामार्फत निर्णयानुसार महानगरपालिकेकडे अगावु कर भरणा केलेल्या नागरीकांना त्यांच्या दरवर्षी येणा-या मालमत्ता कराच्या रकमेमधे त्यांची पूर्वी अगावू भरलेली रक्कम समायोजित करण्यात येत आहे.
सांगवी येथील माझ्या प्रभागातील जेष्ठ नागरीक श्री. प्रकाश गणपत खोत, वय वर्षे ७८ यांनी वेळोवेळी भरलेल्या शासन निर्णयानुसार शास्तीकरासह मालमत्ता कराचा भरणा हा नियमित केला होता. शास्तीकरावरील वेळोवेळी झालेल्या निर्णयानुसार वरील प्रक्रियेमुळे त्यांचे सुमारे चार लाख पन्नास हजार रूपये रक्कम अगावू भरण्यात आला आहे व हि अगावू असलेली रक्कम महानगरपालिका त्यांच्या दरवर्षी येणा-या मालमत्ता करामधे समायोजित करण्यात येत आहे.
सध्या २०२४-२५ या वर्षीचा त्यांचा मालमत्ता कर हा नऊ हजार एकशे पाच (९१०५/-) इतका आहे. म्हणजे अगावू भरलेली रकम समायोजित करण्यात महानगरपालिकेला अजून जवळपास ४५ वर्षे लागतील. सध्या त्यांचे असणारे वय पहाता या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी त्यांना अजून जवळपास ४५ वर्ष जगावे लागेल म्हणजे वयाच्या १२८ व्या वर्षी पर्यंत अगावू भरणा केलेली रक्कम समायोजित करण्यात येईल.
वास्तविक पहाता एखाद्या मनुष्याचे आयुर्मान हे साधारणतः ७५ वर्षे झाले. आम्हालाही काय सर्वांनाच वाटते कि प्रत्येकाने १२८ काय १५० वर्ष आयुष्य जगावे परंतू वास्तविकता हे शक्य नाही म्हणजेच काय आमचे येथील जेष्ठ नागरीक ज्यांना कोणीही जवळचे आप्त नाहीत. श्री प्रकाश गणपत खोत यांच्यावर एक प्रकारे वेळोवेळी बदलाच्या शासन निर्णय प्रक्रियेमुळे कि जे नियमित करभरणा करत होते,
श्री. प्रकाश गणपत खोत यांच्यावर एक प्रकारे वेळोवेळी बदलणा-या शासन निर्णय प्रक्रियेमुळे अन्यायच झाला आहे. श्री. प्रकाश गणपत खोत यांनी २०१२-१३ या वर्षापासून केलेला कर भरणाच्या पावत्या पूर्वी असणाऱ्या करापासून ते शास्तीकरापर्यंत ते पुन्हा माफ झालेल्या शास्तीकरापर्यंत व नंतर पून्हा त्यांच्या समायोजित करण्यात येणान्या रकमेबाबत सर्व पावत्या व भरलेल्या रकमांचे चलन या निवेदनासोबत जोडल्यात आले आहे.
श्री प्रकाश गणपत खोत हे एक प्रातनिधिक उदाहरण आहे कि जे लोक नियमित करभरणा शास्तीकरा सहीत भरणा करत होते. अशी हजारो उदाहरणे आहेत कि ज्या लोकांनी शास्तीकरा सह कर भरणा केला होता व ज्यांची महानगरपालिकेकडे अगावू रक्कम जमा आहे व जी दरवर्षी येणा-या मालमत्ता करामध्ये समायोजीत करण्यात येत आहे. एकप्रकारे हा या हजारो लोकांवर अन्यायच
जे नियमित असलेले करदाते आहेत ज्यांनी अगावू रक्कम महानगरपालिकेकडे आहे ती रक्कम दरवर्षी येणा-या मालमत्ता करामधे समायोजित न करता त्यांना पुन्हा परत एकरकमी देण्यात यावी व अशा सर्व नागरीकांवर झालेला अन्याय दूर करावा.
सध्या महानगरपालिकेत प्रशासन असल्याकारणाने सदर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासनास योग्य ते निर्देश् दयावेत. अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे निवेदना द्वारे माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या द्वारे करण्यात आली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️