


पूर्णानगर, ता.१७ : पि. चि. म. न. पा व पूर्णानगर विकास कृती समिती ह्यांच्या संयुक्त विधमाने आज दिनांक 17 मे, शनिवार रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुल येथे स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबविण्यात आली.

त्या प्रसंगी श्री राजेंद्र घावटे, पि. चि. शहर, कार्याध्यक्ष व्याख्यान्माला समिती श्री अंकुश सुद्रिक, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष, श्री श्रीकांत करोली, उधोगपती श्री संजय नाना पठारे, उधोजक श्री पप्पू शेठ लोढा, सामाजिक कार्यकर्ते श्री टाकळकर,जेष्ठ नागरिक, पालिकेचे माननीय श्री सुभाष कांबळे, आरोग्य सहाय्यक निरीक्षक,सौ सुरेखा हिंगडे, सहाय्यक अधिकारी, माननीय श्री कैलास जगताप, पर्यवेक्षक अधिकारी, श्री आदित्य पवार, पर्यवेक्षक अधिकारी, श्री महेश सांगडे, पर्यवेक्षक अधिकारी अन्य सहकारी व नागरिकांचा देखील उस्फुर्त सहभाग होता.
“स्वच्छता ही बाब आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक असून ती करणे आवश्यक व गरजेचे आहे. त्यासाठी सर्व स्तरांवरील नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे.” असे पूर्णांनगर विकास कृती समितीचे अध्यक्ष सुनील कदम म्हणाले.
येत्या दोन दिवसात उद्धाना मधील वाढलेले गवत छटाई चे कार्य पालिकेतर्फे चालू करण्यात येणार आहे असे अधिकारी वर्गातून सांगण्यात आले.
आपले परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे असे समजून सर्वांनी सहभाग घेतला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
