


पिंपरी, ता. १३: प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातील ९१ वर्षाचा तेजस्वी वारसा लाभलेली शिक्षण संस्था आहे. संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयांमधून हा वारसा अविरतपणे चालवला जातो. याचेच द्योतक म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा इयत्ता १२ वी चा निकाल. याही वर्षी संस्थेच्या ६ कनिष्ठ महाविद्यालयांनी दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. यातील ४ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान आणि वाणिज्य), निगडी एकूण निकाल १०० टक्के.
यातील कु. अथर्व संदिप निकम या विद्यार्थ्याने ९२ टक्के गुण मिळवून शास्त्र शाखेत प्रथम क्रमांक मिळवला, तर वाणिज्य शाखेत कु. कुणाल गायकवाड याने ८७.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान), एन.सी. एल. कॅम्पस, पाषाण – एकूण निकाल १०० टक्के
कु. सिध्दी करंजकर हिने ८७.३३ टक्के इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
मॉडर्न हायस्कूल व कनिष्य महाविद्यालय (वाणिज्य), भोसे, ता. खेड, जि. पुणे – एकूण निकाल १०० टक्के
कु. श्रृती दत्तात्रय कुटे हिने वाणिज्य शाखेत ७९.६७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, वारजे, विज्ञान व वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १०० टक्के.
शास्त्र शाखेत कु. अवनी वैद्य हिने ८८.३३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला, तर वाणिज्य शाखेत कु. सोहम जगताप याने ८३.८३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला.
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे-४११००५,
कला शाखा – ७५%
वाणिज्य शाखा – ९९%
विज्ञान शाखा ९०% इतका निकाल लागला.
मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालय, गणेशखिंड, पुणे.
वाणिज्य शाखा – ९९ टक्के, प्रथम क्रमांक अर्पिता काकडे हिने ७३.५० टक्के इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर एम.सी.व्ही.सी. विभागाचा एकूण निकाल ८९ टक्के इतका लागला.
स्वाती राठोड हिने ७५.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
या घवघवीत यशाचे श्रेय संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे सर, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. सौ. ज्योत्स्ना ग. एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, उपकार्यवाह प्रा. निवेदिता एकबोटे, सर्व मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांना जाते.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या उत्तुंग यशाबद्दल सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️