Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर महापालिकेचा भर – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर महापालिकेचा भर – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

suwarna gaware 05/05/2025
6088f60c-54c9-4e02-b837-8b35a7edea32
Spread the love

: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी भरवला जातो लोकशाही दिन….

पिंपरी, दि.५ मे २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त आज महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत एकूण ३ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या.

यामध्ये महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ च्या काळेवाडी येथील समस्या, लोकशाही दिन अर्जातील समस्या तसेच महत्वाचा दूरध्वनी क्रमांक असणारा फलक बसविणे याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिका-यांना त्याबाबत विविध सूचनाही केल्या.

या लोकशाही दिनानिमित्त नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये शहरातील सर्व स्मशानभूमी या सुशोभित कराव्यात, शहरातील सर्व उद्याने सुशोभित करणे, शहरातील अनधिकृत बांधकामांवर कार्यवाही करावी, नदीतील जलपर्णी काढावी, काळेवाडी परिसरातील क्रीडांगणाची संख्या वाढवावी, जिजाऊ क्लिनिक येथील रुग्णासाठी पत्रा शेड उभारणे, शहरातील बसस्थानकाजवळ स्वच्छता ठेवावी, कोकणे नगर श्री कृष्ण कॉलनी येथील रस्त्यांचे ड्रेनेज गळतीचे काम पूर्ण दुरूस्त झाल्यावर डांबरीकरण करावे या तक्रार वजा सूचना मांडण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण होत असल्याने नागरिक देखील समाधानी दिसून येत आहेत.

यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, लोकशाही दिन समन्वयक उप आयुक्त राजेश आगळे, ,सह शहर अभियंता संजय खाबडे,क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे,किशोर ननवरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, विजय जाधव, किरण अंदुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता राजकुमार सुर्यवंशी, विकास घारे, मिनल दोडल,सागर देवकाते, वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत सुपेकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे, तसेच तक्रारदार वजा सूचना करणारे नागरिक देखील उपस्थित होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी लिपिक प्राजक्ता झेंडे यांचे सहकार्य लाभले.

लोकशाही दिनासाठी अर्ज स्विकृतीचे निकष

लोकशाही दिनासाठी दाखल करावयाच्या अर्जाच्या विहित नमुन्यातील प्रती नागरिकांना सहजतेने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज करताना यामध्ये नमूद तक्रारीवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असेल. हा अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे असावा. नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाही.
——–

कोट

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव पुढे असते. त्यासाठी महापालिकेच्या वतीने महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी मांडलेल्या तक्रार बाजा सूचनांचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. या उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाही दिनामध्ये सहभागी व्हावे.

प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 64
Tags: Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांचे ‘धक्का तंत्र’
Next: शाहू महाराजांना कामगारांची आपुलकी – काशिनाथ नखाते

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.