


पिंपरी, ता. ८: धम्मदीप बुद्धविहार संतनगर मोशी प्राधिकरण सेक्टर 4 मध्ये आज चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रमुख वक्ते अशोक सरतापे गुरुजी यांनी आपल्या भाषणात सम्राट अशोक हे प्रियदर्शी लोकप्रिय राजे कसे होते व त्यांनी काय कार्य केले तसेच त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना सांगितल्या.
याप्रसंगी संघाचे सदस्य गोकुळ गायकवाड,शाहूजी भोसले,दत्तात्रय शिंदे,राजेश नितनवरे ,प्रशांत डांभारे ,राजू कांबळे ,तसेच पल्लवी नितनवरे,सुनीता शिंदे,मृणालिनी डंभारे, आणि इतर उपासक उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते धम्मदीप संघातर्फे मिठाई वाटप केले अभिवादन करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
