Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभागाच्या वतीने ६ कोटीच्या कामात पुन्हा एकदा रिंग..
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभागाच्या वतीने ६ कोटीच्या कामात पुन्हा एकदा रिंग..

suwarna gaware 24/03/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
Spread the love


ठराविक ठेकेदाराच्या फायद्यासाठी MNC ब्रँडचे अधिकृत उत्पादक किंवा वितरक असल्याचे प्रमाणपत्र असावे ही अट टाकून मोबाईल कॉम्पॅक्टर रॅकच्या संदर्भात काढली निविदा


सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा आरोप ..निविदा रद्द करण्याची केली मागणी


पिंपरी, ता. २४: पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या भांडार विभागाच्या वतीने मोबाईल कॉम्पॅक्टर रॅकच्या सिस्टीम साहित्याचा पुरवठा करून ती कार्यान्वित करण्याबाबत दिनांक १२ मार्च २०२५ ते २ एप्रिल २०२५ या काळात इ निविदा सूचना क्र.६३/२०२५-२६ ही ६ कोटी ६ लाख रुपयांची जी निविदा काढण्यात आली ती विशिष्ठ ठेकेदार याला फायदा हेतूने तयार करण्यात आली असल्याने ती रद्द करून नव्या अटी शर्तीचा समावेश केलेली निविदा नव्याने पुन्हा प्रदर्शित करण्यात यावी अशी मागणी सामजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह याच्याकडे केली आहे.

कोल्हटकर यांनी निवेदनात असे म्हंटले आहे की , देशाचे पंतप्रधान सन्मानीय श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशातील तरुण पिढी, युवा उद्योजक यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उत्पादन क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी भारतात उत्पादने विकसित करणे, उत्पादन करणे आणि एकत्र करणे आणि उत्पादन क्षेत्रात समर्पित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे यासाठी यातून प्रोत्साहन दिले जाते. सन २०१४ रोजी याला सुरुवात झाली आज १० वर्षात अनेक नवीन बदल , मदत योजना , स्टार्ट अप अशा गोष्टी करून अनेक भारतीय उद्योजक निर्माण केले त्यांना रोजगार किंवा व्यवसाय देणे हे त्याचे उद्दिष्ट होते.

म्हणूनच अनेक शासकीय , निमशासकीय संस्था किंवा खाजगी संस्था यांनी मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप उद्योजक यांना सहभागी करून घ्यावे म्हणून शासकीय निविदा प्रक्रिया यामध्ये प्राध्यान्य देण्याचे आदेश आहेत त्यामुळे स्थानीक स्वराज्य संस्था , पंचायत समिती, सरकारी संस्था यांनी याकामात स्थानिक उद्योजक सहभागी करून घेतले.

पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी वेळोवेळी खुर्च्या, बाक , टेबल तसेच अशा प्रकारच्या अनेक कामात स्थानिक उद्योजक यांना सहभागी न होता यावे. म्हणून अनेक जाचक अटी शर्ती टाकून त्यांना बाहेर केले अशा अनेक निविदा प्रक्रिया आहेत. सध्या पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या भांडार विभागाच्या वतीने मोबाईल कॉम्पॅक्टर रॅकच्या सिस्टीम साहित्याचा पुरवठा करून ती कार्यान्वित करण्याबाबत दिनांक १२ मार्च २०२५ ते २ एप्रिल २०२५ या काळात इ निविदा सूचना क्र.६३/२०२५-२६ ही ६ कोटी ६ लाख रुपयांची जी निविदा काढण्यात आली त्यात पण गुणवत्ता , टिकाऊपणा भविष्यातील आवश्यक सेवा समर्थन मनपाचा होणार फायदा अशा गोष्टींचा विचार करून अथवा कारण देऊन नामांकित MNC ब्रँड असणाऱ्या मे. हर्मन मिलर, मे.स्टीलकेस आणि गोदरेज या ३ ब्रँडच्या उत्पादित कंपनी किंवा त्याचे वितरक यांना सहभागी होण्याची संधी देण्याची अट सदर निविदा प्रक्रियेत आहेत खरे पाहता गोदरेज ही कंपनी सोडली तर आमच्या माहितीप्रमाणे मे.हर्मन मिलर आणि स्टीलकेस ह्या दोन कंपन्या तर परदेशी आहेत त्यामुळे क्रेंद्राच्या मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया अशा उपक्रमांना छेद देण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी या निविदा प्रक्रियेत MNC ब्रँडचे उत्पादक यांना संधी देऊन केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने जी निविदा काढण्यात आली त्यात MNC ब्रँडचे अधिकृत कंपनी ,उत्पादक किंवा वितरक असावे अशी अट टाकण्यात आली त्यामुळे शहरातील उद्योजक , मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया यातील व्यवसायिक उत्पादक कंपन्या यांना यात सहभागी होता येत नाही.

आज शहरात किंवा राज्यात असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी अनेक शासकीय , निमशासकीय किंवा खाजगी संस्था यांना पुरवठा केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे वस्तूच्या गुणवत्ताबाबत त्यांनी मान्यताप्राप्त शासकीय अभियांत्रिकी तंत्र निकेतन महाविद्यालय यांचे तपासणी प्रमाणपत्र घेतले आहे म्हणजे थोडक्यात गुणवत्ता पूर्वक काम करणारे अनेक उद्योजक आणि मेक इन इंडिया पुरवठादार उपलब्ध असताना सुद्धा फक्त ठराविक ठेकेदाराच्या फायद्यासाठी तरी अशा पद्धतीने निविदा अटी शर्ती तयार केल्या नसतील ना ? अशी शंका निर्माण होत आहे.

आज अशा गुणवत्ता पूर्वक काम करणारे आणि सदर कामाचा शासकीय निमशासकीय अनुभव असणारे अनेक उत्पादक या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित आहे पण MNC ब्रँडचे अधिकृत उत्पादक कंपन्या अशा अटी शर्ती मुळे त्यांना यात सहभागी होता येत नाही .

तरी सदर MNC ब्रँडचे अधिकृत उत्पादक कंपन्या अशी अट काढून शासकीय निमशासकीय संस्था यांना सदर वस्तूचा करणारे गुणवत्ता पूर्वक काम करणा- या कंपन्या उद्योजक यांना यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देऊन त्यात एक स्पर्धा तयार करावी जेणे करून सदर वस्तूचा योग्य दर मिळून मनपाचा फायदा होण्यास मदत होईल. अशा स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि या निविदेत त्यांचा सहभाग वाढावा अशा पद्धतीने सर्व समावेशक अटी शर्तीचा सहभाग करावा अथवा अशा वस्तूचा पुरवठा करणारे यांची पुन्हा एकदा प्री बीड मीटिंग आयोजित करावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून मा.आयुक्त यांना कऱण्यात येत आहे.


सदर निवेदनाच्या माध्यमातून मा.आयुक्त साहेब , आपणांस विनंती आहे की , पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभागाच्या वतीने मागे सुद्धा ठराविक ठेकेदाराच्या फायद्यासाठी बेंच,बाके, टेबल खुर्च्या यांची निविदा प्रक्रियेत अशाच अटी शर्ती टाकण्यात आल्या होत्या पण नंतर पुन्हा सदर निवेदेला विरोध झाला आणि त्याच्या अटी शर्ती मध्ये बदल करून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.

सध्या पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या भांडार विभागाच्या वतीने मोबाईल कॉम्पॅक्टर रॅकच्या सिस्टीम साहित्याचा पुरवठा करून ती कार्यान्वित करण्याबाबत दिनांक १२ मार्च २०२५ ते २ एप्रिल २०२५ या काळात इ निविदा सूचना क्र.६३/२०२५-२६ ही ६ कोटी ६ लाख रुपयांची जी निविदा काढण्यात आली ती विशिष्ठ ठेकेदार याला फायदा मिळवा ह्या हेतूने तयार करण्यात येऊन यात मुद्दाम MNC ब्रँडचे अधिकृत उत्पादक यांचा समावेश करण्यात आला असावा जेणे करून स्थानिक उद्योजक उत्पादक कंपन्या यामध्ये सहभागी होऊ नये आणि ठराविक ठेकेदार याला लाभ मिळावा .


तरी सदर निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न ह्याचा विचार होऊन सदर निविदा प्रक्रियेत सर्व समावेशक अटी शर्ती टाकण्यात येऊन ती पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्ध करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 216
Tags: #mahaplika ring #rahul kolhatkar Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: दुर्गा टेकडीचा विकास करताना नागरिकांच्या सूचनांचा विचार केला जाईल, आयुक्त शेखर सिंह यांचे प्रतिपादन
Next: फॅशन शो च्या माध्यमातून अवयव दानाचा संदेश

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.