


पिंपरी, ता. २३: भारतीय सिंधु सभा आणि आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधी समाजातील थोर क्रांतिकारक हेमुकलानी यांची १०२ वी जयंती आज दिनांक २३ मार्च वार रविवार सकाळी साडे आठ वाजता साजरी करण्यात आली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक लुल्ला,शिवनदास पमनानी, आणि ३७ वर्षे शिक्षण क्षेत्रात प्राचार्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या विनिताजी बसंतानी उपस्थित होते. या वेळी बोलताना मनोहर जेठवानी यांनी पिंपरी येथील हेमू कलानी उद्यानात सध्या असलेल्या अर्ध पुतळ्याच्या जागी पूर्णाकृती पुतळा महापालिका आयुक्त, पिंपरी चे आमदार अण्णासाहेब बनसोडे, आमदार अमितजी गोरखे, आमदार उमाताई खापरे यांच्या कडे सर्व समाजबांधवांच्या वतीने निवेदन देवून करणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या विनिताजी बसंतानी यांनी सिंध प्रांतातातुन भारतात आल्यावर आपला सिंधी बांधव संपूर्ण देशात विविध ठिकाणी स्थायिक झाल्यामुळे आपण आपल्या मुळ सिंधी भाषेमध्ये बोलणे कमी झाले होते पण आता मात्र ते चित्र राहिलेले नाही. आता आपण आपल्या घरामध्ये,प्रसंगी व्यवहारात आपला सिंधी समाज सिंधी भाषा बोलताना आढळतो याचा आनंद मला नक्कीच आहे.
आज आपण थोर क्रांतिकारक हेमु कलानी यांच्या जयंतीनिमित्त एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असताना वयाच्या एकोणिसाव्या वर्षी या देशासाठी त्यांनी बलीदान दिले कारण एक रेल्वे गाडी ब्रिटिश सैनिकांना, आणि काही रसद घेऊन जाणार असल्याचे कळल्यावर क्रांतिकारक हेमु कलानी यांनी रेल्वे रुळावर ज्या पट्या असतात त्या काढल्या तर मोठा अपघात होऊ शकतो आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या रसदीचा उपयोग होईल म्हणून त्यांनी त्या पट्या काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच ब्रिटिश सैनिकांनी त्यांना पकडून त्यांच्या सहकाऱ्यांची नावे सांगावी या साठी खूप प्रयत्न करून देखील त्यांनी शेवटपर्यंत नावे सांगितली नाही म्हणून त्यांना फाशी देण्यात आली असा इतिहास असल्याचे सांगितले.
यावेळी विनीता बसंतानी, अशोक लुल्ला, शिवनदास पमनानी, मनोहर जेठवानी, अजित कंजवानी, सुशील बजाज,श्रीचंद नागरानी, महेश मोटवानी, हिरालाल रिझवानी, सुनील कुकरेजा, तुलसीदास तलरेजा,इंदर बजाज,उमेश मधुकर बामरे, गणेश वाणी,उमेश भोजवानी, आत्म प्रकाश मटाई,जया आसवांनी,काजल लखवानी,सुरिंदर मंघवानी, राजेश लखवानी,चेतन ओछानी,हरेश छाबलानी हेमंत राजेश, डॉ पुष्पा पमनानी, आणि इतर समाजबांधव उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
