


चिखली,ता. २५: भाजपा महाराष्ट्र सदस्य नोंदणी अभियान २०२५ चा शुभारंभ दि. २५ रोजी आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली कुदळवाडी चिखली येथे केला. दिनेश यादव यांच्या हस्ते पहिला सदस्य नोंदणी करून अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

आपण सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपा हा आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून अभिमानाने उभा आहे. आपल्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवावरच देश विकासाच्या मार्गावर अत्यंत वेगाने पुढे जात असून हा राष्ट्रप्रेम व विकासाचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान प्रत्येकाने यशस्वी करावे व जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडावे, असे आवाहन दिनेश यादव यांनी सर्वांना केले.
यावेळी सर्व पदाधिकारी, नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️