


खान्देश युवा महासंघाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी, ता. १५ : महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, महिलांच्या स्पर्धा यांचे महासंघातर्फे आयोजन.संपूर्ण देशात आपल्या सुश्राव्य वाणीने मंत्रमुग्ध करणारे राधे राधे सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांना अखिल भारतीय खान्देश मंच व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने “राष्ट्रीय किर्तनकार विभूषण पुरस्कार” पीएमआरडीए ग्राऊंड वाल्हेकरवाडी चिंचवड येथे हजारो हरिभक्तांच्या साक्षीने प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय खान्देश मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील, खान्देश युवा महासंघाचे निमंत्रक माऊली जगताप, किशोर अहिरे, हिरालाल पाटील, एकनाथ सोनवणे,भोलेश्वर मंदिर ट्रस्ट चे दत्ता चिंचवडे, माउली सूर्यवंशी, मा .नगरसेविका आशाताई सूर्यवंशी,हभप नामदेव महाराज बिरारी, रवींद्र कुंवर, उमेश बोरसे,उमेश पाटील,संदीप जगताप, ललित पवार,नितीन पाटील,शरद सोनवणे, प्रशांत महाजन, राजेंद्र माळी, नरेंद्र चऱ्हाटे, नितीन किणगे हे प्रमुख उपस्थित होते. तत्पूर्वी हभप रविकिरण महाराजांनी खान्देशच्या अहिराणी भाषेत किर्तन सादर केले.
शहरातून मोठ्या संख्येने त्यांचे किर्तन ऐकण्यासाठी खान्देशी जनसमुदाय जमला होता. किर्तन सोहळ्याचे उदघाटन विश्वजीत बारणे, निलेश तरस,संतोष बारणे, मा नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे, राजेंद्र साळुंखे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, दादाजी पगार, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या निमित्ताने हभप रविकिरण महाराज म्हणाले,” सामान्य कुटूंबातुन किर्तन सेवेत आलेल्या व्यक्तीचा महान संत ज्ञानोबा – तुकोबा ,मोरया गोसावींच्या पुण्यनगरीमध्ये सन्मान होणे अत्यंत आनंदाची पर्वणी आहे.माझ्या खान्देशी बांधवांच्या उपस्थितीत मला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मूल्यवान आहे.”
कार्यक्रमाचे निमंत्रक माउली जगताप म्हणाले,” खान्देश युवा महासंघातर्फे पाचव्या वर्धापनदिनी भागवताचार्य हभप रविकिरण महाराजांचे किर्तन प्रथमच पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आले याकरिता चाकण, तळेगाव, भोसरी, आकुर्डी तसेच सहरातील उपनगरातून मोठ्या संख्येने खान्देशी बांधव उपस्थित राहिले.”
वर्धापन दिन सोहळ्यास विशेष योगदान अनिल नेरकर पाटील, सचिन सैंदाणे पाटील, सौरभ पाटील,देवेंद्र पाटील, राहुल मोरे पाटील,चंद्रकांत सैंदाणे, गौरव पाटील, जयेश पाटील, सत्यम ढोणे, नागेंद्र पाटील, योगेश सोनवणे, राहुल महाजन, देवदत्त पाटील, मयूर पाटील, संदीप पाटील, सोन्या पवार, कुणाल पाटील, विश्वास पाटील, भैया कुमार,भूषण पाटील,प्रविण महाले, संभा जाधव ,अविनाश पाटील यांनी दिले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️