


चिखली, ता. 23 : श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील श्री मल्हारपंत प्रतिष्ठाणच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चिखली येथील युवा उद्योजक ऋषिकेश मुकुंद देशमाने यांना स्टॉक मार्केटिंग मधील यशस्वी व्यवसायाबद्दल तसेच सामाजिक कार्याबद्दल चिखली रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार संत एकनाथमहाराजांचे चौदावे वंशज ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.ऋषिकेश देशमाने यांची घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना,जिद्दीने आणि अविरत परिश्रमाने पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
आज स्टॉक मार्केटिंगच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार देण्याचे काम ते करत आहेत.चिखली गावातील अनेक समाजसेवी संस्थांना ते आर्थिक मदत करत असतात.कमी वयातकेलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार दिल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप नेवाळे ,अध्यक्ष मयुर नेवाळे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आणि संत संताजी सेवा मंडळाच्या वतीने देखील ऋषिकेश मुकुंद देशमाने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️