


पिंपरी, ता. ८ -प्रतिनिधी: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन (मधुकर पवळे क्रीडांगण) यमुना नगर निगडी या ठिकाणी दिव्यांग फाउंडेशनच्या वतीने शंभर वधू व वर यांचा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नवविवाहित दापत्यांना संसारासाठी लागणाऱ्या संपूर्ण गोष्टी या देण्यात आल्या त्याचबरोबर उदारनिर्वाह करण्यासाठी पिठाची चक्की देखील नव वधू वरास देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग फाऊंडेशनचे हरिष सरडे व बाळासाहेब कांबळे यांनी केले होते.
याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक हेमंत (काका) हरेहरे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, रंगनाथ पवार ,रवीजी कळमकर, बाबा परब, उद्योजक बापू घोलप ,अनिल गायकवाड ,नगरसेवक उत्तम केंदळे, गिरीशजी देशमुख ,प्रशांत बाराहाते ,गजानन दामले काका, प्रवीण रणखांबे ,सुरज ओंबळे, नारायण पाटील, सचिन ढोबळे ,हेमंत नरेश जालन ,बाळ भिंगारकर ,डॉक्टर पटवर्धन ,भावी पाटील ,निखिल कुठे ,जयदीप पाटील ,अमरसिंह पाटील अविनाश देसाई, विजय पाटील, शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा संचिताताई गोसावी, मुख्य सचिव कल्पना मोरे ( दाखले ),मावळ लोकसभा अध्यक्षा भारती चांदणे,तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️