


इंद्रायणीनगर, ता.२ : भोसरीतील विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघाकडून महात्मा फुले यांना त्यांच्या १३४ व्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण वावगे, तर प्रमुख उपस्थिती बारी समाज अध्यक्ष ओंकार काटोले, धनगर समाज अध्यक्ष नागेश वसतकार, शरद बोरसे, राजेंद्र बोरसे, ओंकार घटाळे, विशाल महाराज गडगे उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन व हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी फुलेंच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. संत सावतामाळी युवक संघाचे अध्यक्ष विशाल महाराज गडगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना महात्मा फुले काव्य दर्पण व सावता दर्पण काव्यसंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ आयोजित वधू -वर परिचय मेळावा नोंदणीचे उदघाट्न करून नोंदणीचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी संघाचे अध्यक्ष दामोदर गाडगे, सुखदेव वानखडे, सुखदेव उमरकर, आशिष उमरकर, गजानन निमकर्डे, योगेश गाडगे, राजेंद्र रोटे, पांडुरंग उगले, संदीप राऊत, प्रसन्न उमाळे, सुरेश जुमडे, उमेश तायडे, नारायण पुंड, गजानन चोपडे, सुनिल इंगळे, वसंत बंड, गोपाल इंगळे, वाघमारे, प्रतिक धाडसे, कल्पना धाडसे, तुषार उमाळे, प्रकाश कवर, नारायण निमकर्डे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमोल बगाडे, आभार श्रीकृष्ण अत्तरकार यांनी मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️