Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांचा भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांचा भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा

suwarna gaware 15/11/2024
IMG-20241115-WA0004
Spread the love

चिंचवड विधानसभेचे वातावरण फिरले :  सिद्दिक शेख यांचा भाऊसाहेब भोईरांना जाहीर पाठिंबा

भाऊसाहेब भोईर यांचा विजय निश्चित : त्यांच्यासोबत उभे राहण्याचे सर्व समाजांना आवाहन – सिद्दिक शेख

आजपर्यंत मी कधीही जातीपातीचे धर्माचे राजकारण केले नसल्याने लोकांचा मला थेट पाठिंबा – भाऊसाहेब भोईर

चिंचवड प्रतिनिधी, दि : १५ – प्रचारामध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध संस्था  संघटनांकडून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा मिळत आहे. सध्या याच चिंचवड विधानसभा मतदार संघातून रिंगणात असलेले प्रतिस्पर्धी सिद्धिक शेख यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला.

या प्रसंगी सिद्धिक शेख, भाऊसाहेब भोईर, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे चिंचवड विधानसभेचे अधिकृत उमेदवार आणि अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी आज अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

चिंचवड विधानसभेत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार नसल्याने सर्व संविधान प्रेमी, लोकशाही प्रेमी जनतेची अडचण झाली होती, महा विकास आघाडीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार यांच्यात वैचारिक दृष्ट्या काहीच फरक नसल्याचे सांगत सिद्दिक शेख यांनी भोईर यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

ते पुढे म्हणाले की अपना वतन संघटनेच्या माध्यमातून सिद्दिक शेख यांनी मोठे काम उभे केले आहे. बहुजन, अल्पसंख्य व दलीत समाजाच्या हक्काचे प्रश्न घेऊन ते मागील दहा वर्षांपासून लढत आहेत. आपण आज या क्षणापासून भाऊसाहेब भोईर यांच्यासोबत प्रचारात सहभागी होत असून मतदार संघातला प्रत्येक माणूस भाऊसाहेबांकडे घेऊन येत्या २० तारखेला त्यांना भरभरून मतदान करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

भाऊसाहेब भोईरांच्या उमेदवारीने चिंचवड मतदार संघात मोठी खळबळ उडाली होती, त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत कोऱ्हाळे यांना सोबत घेवून महाविकास आघाडीला मोठे खिंडार पाडले आहे. रिपब्लिकन पक्षाचे दोन गट तसेच तेली, माळी, धनगर, मातंग या समाज घटकांचा उघड पाठिंबा भाऊसाहेबांना आहे. आता सिद्धिक शेख सोबत आल्याने भोईर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसून येते.

भोईर म्हणाले की “माझ्या कामाचे मूल्यमापन आपल्याला माहीत आहे. गेल्या तीन दशकांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. या निवडणुकीत मला अनेक संघटनांनी घरी येवून पाठींबा दिला. नोटा पेक्षा भाऊसाहेब भोईर हा मतदारांसाठी उत्तम पर्याय आहे. मी जो निर्धार केला होता तो पूर्णत्वास नेण्यासाठी गेल्या ४ महिन्यापासून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे. पुरोगामी विचार माझी विचारधारा होती. मात्र आता मी विकासाची विचारधारा हाती घेतली आहे.

जनतेला आता बदल तर हवाच पण त्याचबरोबर परिवर्तन हवे आहे. या निवडणुकीत चिंचवड मतदार संघातून मला मतदार मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करतील असा माझा ठाम विश्वास आहे. कोऱ्हाळे म्हणाले की भाऊसाहेब भोईर हे माझे राजकीय जीवनातील गुरू आहेत. एवढेच नव्हे तर ते माझे मोठे बंधू आहेत. गेल्या एका तपापासून माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. वेळोवेळी त्यांनी मला मदत तसेच अनमोल मार्गदर्शन केले आहे आणि करत आहेत.

ते पुढे म्हणाले की, मी जरी शिवसेनेचा असलो तरी मी माझा व्यक्तिगत निर्णय घेवून चिंचवडचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मी चिंचवडचा असल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना तसेच चिंचवड वासियांना वाटते की आपल्या चिंचवडचा आमदार झाला पाहिजे. म्हणून मी आज त्यांच्या पाठिंबा खंबीर उभा आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 64
Tags: #चिंचवड #भाऊसाहेब भोईर Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: पिंपळे सौदागर भाऊसाहेब भोईरांच्या पाठीशी – नागरिकांनी जाहीर केला पाठिंबा
Next: भाऊसाहेब भोईर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.