पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघासाठी २३ नामनिर्देशन अर्जाची विक्री



थेरगाव, दि .२५: चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी ३ वाजेपासून ते आज दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत २३ व्यक्तींनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून एकूण ४५ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली असून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. त्यानुसार थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आतापर्यंत ३७ व्यक्तींनी एकूण ८० नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील –
शंकर पांडुरंग जगताप (भारतीय जनता पार्टी), मोरेश्वर महादु भोंडवे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), ऍड. अनिल बाबू सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), रविराज बबन काळे (आम आदमी पार्टी), खाजाभाई खाडेलाल नदाफ (स्वराज शक्ती सेना) संतोष नागोराव सोनोने (बहुजन समाज पार्टी), तुकाराम महादू भोंडवे (भारतीय राष्ट्रीय पक्ष), संदेश दत्तात्रेय नवले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रतिक संदेश नवले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मयुर कैलास जयस्वाल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गौरव शिवाजी चौधरी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), जितेंद्र प्रकाश मोटे (वंचित बहुजन आघाडी), भरत नारायण महानवर (राष्ट्रीय समाज पक्ष), गणेश सुरेश जोशी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे).
अपक्ष – निलेश शिवाजी रावडे, अरूण श्रीपती पवार, ऍड. संदीप गुलाब चिंचवडे, हरी तापीराम महाले, रफिक रशीद कुरेशी, संतोष श्रीमंत फुलारे, सचिन अरूण सिद्धे, नंदू गोविंद बारणे, अनिल विष्णूपंत देवगावकर, मयूर बाबू घोडके, विनायक सोपान ओव्हाळ, शिवाजी तुकाराम पांडूळे, सचिन वसंत सोनकांबळे, राहुल अभिमान राऊत, सिद्धीक ईस्माइल शेख, सतिश भास्कर काळे, रविंद्र विनायक पारधे, गणेश शिवाजी राऊत, जसविंदर सिंग इंदूपाल सिंग स्तु, राजेंद्र मारूती काटे, गणेश साईनाथ खंडेजोड, कासिम राजासाब बागवान, ऍड. विपुल गजानन येवले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
