




पिंपरी : राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती आहे.

भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केलीय तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने अजित पवार (बारामती), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव),अतुल बेनके (जुन्नर), दिलीप मोहिते (खेड आळंदी), दत्तात्रय भरणे (इंदापूर), सुनील शेळके (मावळ),चेतन तुपे (हडपसर), तर अण्णा बनसोडे यांना पिंपरी मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
#Annabansode#Mahayuti#Rashtrwadi#Baramati#Ajitpawar#Dilipvalsepatil

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
