


पिंपरी चिंचवड, ता. २४: कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ महाराष्ट्र च्या वतीने स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त महासंघाचे कार्यालयासमोर चिंचवड येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीविरोधात निर्भयपणे लढणारे राजगुरू यांचा त्याग नेहमीच प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमास कष्टकरी संघर्ष महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
