


पिंपरी, दि. १३: संस्थेच्या सन २०२३-२०२८ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालकांमधुन दि. १२/८/२०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळ सभेत पतसंस्थेचे चेअरमनपदी – विजय सभाजी मुंडे यांची, व व्हा. चेअरमनपदी श्री चंद्रकांत संपतराव भोईर सेक्रेटरीपदी श्री भास्कर मारुती फडतरे व खजिनदारपदी श्री विश्वनाथ जगन्नाथ लांडगे यांची निवड मा. गजेंद्र एल. सवाईकर निवडणुक निर्णय अधिकारी, तथा सहाय्यक सहकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर ३ याचे अध्यक्षतेखाली व पिं. चिं. मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मा. शशिकांत उर्फ बबनराव झिजुर्डे यांच्या उपस्थित एकमताने करण्यात आली.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी व विदयमान संचालक यानी मा. अध्यक्ष श्री शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार हा विनम्र आणि तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार व्यवस्थित रित्या चालविण्याचा संकल्प केला. व सभासदांना बचतीच्या सवयी लागण्यासाठी ठेवीवर जास्तीत जास्त ९% व्याज व कन्यादान ठेवीवर १०% ते १०.५०% व्याजदर करुन संस्था स्वभांडवलावर उभी करणेचे धोरण ठरविले आहे.
तसेच सभासदांना कमीत कमी (११%) व्याज दराने कर्ज पुरवठा करुन सभासदांची आर्थिक अडचणी दूर करणार आहोत. तसेच मा. अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी केलेली संस्थेची १७ वर्षापूवीर्ची वार्षिक ऊलाढाल रु.१७ कोटीच्या आसपास होती आता २२ वर्षात सस्थेची वार्षिक ऊलाढाल रु. २०४ कोटीच्या वर झाली आहे. व कर्ज मर्यादा रु. ५० हजारावून रु. २० लाखापर्यंत वाढविले आहे. त्याची थकबाकी ०.६०% इतकी आहे. यावरुन संस्थेची आर्थिक स्थिती पाहता संस्थेला सतत ‘अ’ वर्ग दर्जा मिळालेला आहे.
संस्था स्थापनेपासून सलग ५४ वर्ष नफा मिळवून नफ्यातून सभासदांना जास्तीत जास्त १३% १२% लाभांश वाटप करून सभासदांना आर्थिक मदत करत आहे. संस्थेच्या सलग २५ वर्ष सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षिस म्हणून रुपये ५०००/- वाटप करीत आहे. तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था आहे.
सतत सभासदांच्या हितासाठी व तत्पर सेवेसाठी सदैव आग्रही आहे. संस्थेच्या आर्थिक उलाढाली मध्ये अधिकाअधिक वाढ करणेचे व सभासदांच्या अडचणी दूर करणेचे संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाने एकविचाराने केला आहे.
यावेळी संस्थेचे विदयमान संचालक व माजी पदाधिकारी शिवाजी येळवंडे, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वनाथ लांडगे, अभिषेक पुगे, सनी कदम, नथा मातेरे, विजय नलावडे, अनिल लखन, विजया कांबळे, संदीप कापसे, कृष्णा पारगे, योगेश रानवडे, वैभव देवकर, विशाल भुजबळ, गणेश गवळी, युनुस पगडीवाले व संस्थेचे सल्लागार दिगंबर चिंचवडे, धमेंद्र शिंदे, संजय कापसे, लाला गाडे, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर, तुषार कस्पटे, सूरज टिंगरे, दत्तात्रय ढगे, मदन चिंचवडे, भाऊसाहेब शेलार, किशोर आठवाल, गौतम पायाळ, गौतम भालेराव, राकेश चव्हाण, रमेश लोंढे, सुधीर वायदंडे, धनंजय जाधव, सुनिल कुदळे, हनुमंत चाकणकर व सर्व प्रभागातील संघटनेचे मेदाधिकारी व महासंघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
