Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे दूरदृष्टीपूर्ण विकासकार्य कायम स्मरणात राहील- मुख्यमंत्री फडणवीस
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे दूरदृष्टीपूर्ण विकासकार्य कायम स्मरणात राहील- मुख्यमंत्री फडणवीस

suwarna gaware 01/01/2026
28ef8a9d-031a-4da0-afd5-bcb812894c27
Spread the love

कार्यकर्त्यांना प्रेरणा, ऊर्जा देणारे ”शक्तीस्थळ’ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थतित लोकार्पित

मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही कायम जगताप कुटुंबियांच्या पाठीशी

आमदार शंकर जगताप यांच्याकडून लक्ष्मणभाऊंच्या कार्याला मानवंदना

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्ते गहिवरले!  

पिंपरी 1 जानेवारी (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या माध्यमातून शहरात झालेल्या चिरस्थायी कार्याची आठवण देणारे, तमाम कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण आज करण्यात आले. हे शक्तीस्थळ कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे ठरेल असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गुरुवारी (दि 1) म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहराला विकासाचा ठोस चेहरा देत सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांनी केले.  औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या या शहराला अत्याधुनिकतेकडे नेण्यासाठी लक्ष्मणभाऊंनी राज्य सरकार आणि महापालिकेचा समन्वय साधत विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन प्रत्यक्षात उतरवले.  त्यांची कारकीर्द,  विकासातील योगदान कायम स्मरणात राहील असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याचा आढावा देणारा आणि कार्यकर्त्यांच्या ऊर्जेचे केंद्र ठरणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण पिंपळेगुरव येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार महेश लांडगे, बापूसाहेब पठारे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार अश्विनी जगताप, चंद्रकांत मोकाटे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार विलास लांडे, उद्योजक उमेश चांदगुडे,  माजी नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे, ऐश्वर्या रेणुसे, चंद्ररंग डेव्हलपर्सचे विजय जगताप  तसेच जगताप कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याचा जीवनपट उलगडला. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना कार्यकर्तेही  गहिवरलेले पहायला मिळाले. 

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यावेळी म्हणाले,आम्ही कायम जगताप कुटुंबियांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. यापुढील काळात लक्ष्मणभाऊंनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या स्वप्नातील शहर आज पूर्णत्वाला आणले जात आहे.  त्यांच्या स्वप्नातील शहराचा विकास आराखडा आपल्याला अस्तित्वात आणायचा आहे. ते केवळ निवडणुका नव्हे तर मन जिंकणारे नेते होते.  त्यांच्या आठवणी कायम चिरकाल हृदयात आहेत आजचे हे शक्ती स्थळ त्यांच्या प्रेरणेची ऊर्जा देणारे केंद्र ठरेल.

लक्ष्मणभाऊ म्हणजे शेती, मातीतून तयार झालेले नेतृत्व होते.  कोणताही मोठा राजकीय वारसा त्यांच्या जवळ नव्हता. मात्र स्वतःच्या हिमतीवर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि मागे वळून कधी पाहिलेच नाही.  येथील नदीत नाव उलटण्याचे निमित्त झाले आणि  या शहराला सर्वंकष असे नेतृत्व लक्ष्मणभाऊंच्या रूपात मिळाले. असे अपघात पुन्हा आपल्या शहरात व्हायला नको. आपले शहर विकासाच्या वेगाने धावले पाहिजे.

हा एकच विश्वास आणि हीच जिद्द काय मनात ठेवून त्यांनी पिंपरी चिंचवड शहरासाठी, शहर अत्याधुनिक करण्यासाठी जे जे हवे ते ते या शहरांमध्ये आणले. युवा अवस्थेत राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते नगरसेवक म्हणून निवडून आले.  तब्बल 21 वर्षे या पदावर कायम राहत केवळ समाजकारण करत राहिले. माणसे जोडत गेले म्हणूनच त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.  ते चार वेळा आमदार राहिले. या कालावधीत शहराला विकासाच्या वेगाशी जोडले.

पिंपरी चिंचवड शहराला चेहरा देण्याचे काम लक्ष्मणभाऊंनी केले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून मोठी प्रगती झाली. अनेक कारखान्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या शहरामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत होती. एक प्रकारे मिनी महाराष्ट्र म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख होत असताना या शहराला विकासाचा नवा आयाम देण्याचे काम लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून झाले.

पिंपरी चिंचवडमधील त्यांची कारकीर्द, त्यांचे विकासातील योगदान कोणीही विसरू शकत नाही. आमदार म्हणून शहराच्या विकासाच्या दृष्टीने ते कायम संघर्ष करत राहिले. अत्याधुनिक शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख होताना लक्ष्मणभाऊंचे योगदान कायम स्मरणात राहणार आहे. राज्य सरकार,  पिंपरी चिंचवड महापालिका या दोघांचा मेळ घालत लक्ष्मणभाऊंनी या शहराला चेहरा देण्याचे काम केले.  विकासाचे व्हिजन  खऱ्या अर्थाने लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शहरात रुजवले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडे आध्यात्मिक बैठक होती. वारकरी संप्रदायाशी त्यांचे घट्ट नाते होते. मातीशी जोडलेली नाळ त्यांनी कधीच सोडली नाही. त्यामुळेच खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती. उत्तम खेळाडू, सांघिक नेतृत्व या माध्यमातून त्यांचे काम होते. ते उत्तम घोडेस्वार होते.  त्यामुळेच विकासाचा वेग त्यांनी कायम राखला. शहर विकासाच्या अत्याधुनिक कल्पना त्यांच्या ठायी वसलेल्या होत्या.  

त्यामुळेच आज या शहराचे पालटलेले रूप आपण पाहतो. कचऱ्यापासून वीज निर्मिती,  24 x 7 पाण्यासाठी अमृत योजना, नदी सुधार योजना अशा सर्व योजना चिरकाल लक्ष्मणभाऊंच्या कार्याची आठवण देत राहतील. लक्ष्मणभाऊ लढवय्ये होते.  विपरीत परिस्थितीतही ते नेहमी विजयी होत होते. त्यांच्या उभ्या आयुष्यात कुठल्याही परीक्षेत त्यांचा पराजय झालेला आपण पाहिला नाही मात्र नियतीने त्यांना हरवले. ही  पोकळी कधीही भरून निघणारी नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. 
 ————————————–

भाऊंकडून मुख्यमंत्री म्हणून उल्लेख आणि शपथविधी!

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांना काळाच्या पलीकडे पाहण्याची सवय होती. विधान परिषदेच्या निवडणुकीचा तो क्षण मी विसरू शकत नाही. अटीतटीची परिस्थिती होती. आमदार म्हणून त्यांचे मत महत्वाचे होते. आमदार शंकर जगताप यांना मी फोन केला. पक्षाला गरज आहे मात्र लक्ष्मण भाऊंची शारीरिक परिस्थिती असेल तरच त्यांना मतदानाला आणा असा निरोप दिला. भाऊंच्या कानावर ही गोष्ट पोहोचली.  तेव्हा त्यांनी पक्ष प्रथम असे म्हणत मी मतदानाला जाणारच असे सांगितले. कार्डियाक ॲम्बुलन्समधून येत त्यांनी मतदान केले. त्यामुळे मला त्यांनी मुख्यमंत्री साहेब म्हणून हाक मारली.त्यानंतर 15 ते 20 दिवसातच सत्ता बदल झाला. मी मुख्यमंत्री झालो अशी आठवणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.


लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अकाली निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली. जसे जगताप कुटुंबीयांनी सर्वस्व गमावले होते. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी भक्कम पाठीराख्याला गमावले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या पाठीशी उभे राहत खंबीरपणे साथ दिली. पिंपरी चिंचवडकरांना चांगल्या सुविधा देऊन त्यांना अत्याधुनिक शहरात राहण्याचे स्वप्न भाऊंनी दाखवले. त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याची मी ग्वाही देतो. आजलोकार्पण झालेले शक्तीस्थळ कायम ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील.  लक्ष्मणभाऊंच्या आदर्शावर कायम चालत राहण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. 

शंकर जगताप
आमदार , पिंपरी चिंचवड शहर. 


suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 35
Tags: #bjp #shankar jagtap #चिंचवड Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: पिंपळे सौदागर-रहाटणीचा यंदा कायापालट होणार..
Next: महापालिका निवडणूक; अखेर ३८ उमेदवारांनी घेतली माघार

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.