


पिंपरी चिंचवड, ता. ३१: आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग 9 ब च्या अधिकृत उमेदवार सौ आस्मा इम्रान शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवीत आहोत.

संपूर्ण शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले असताना.प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचं पक्षांनी ठरवलं.म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत होणार असून मायबाप जनतेला नवीन पर्याय मिळणार आहेत.या प्रभागात तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर सर्वसामान्य घरातील चार माणसे निवडणूक लढवीत आहेत.
पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षाने न्याय दिला पक्ष संपूर्ण ताकतीने पाठीशी उभा राहिला.आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय सुप्रियाताई सुळे,आदरणीय रोहित दादापवार,मेहबूब भाई शेख आणि सर्वात विशेष माझे मार्गदर्शक माझे पाठीराखे खासदार डॉ अमोल दादा कोल्हे यांचे मनापासून आभार. कारण या सर्व नेत्यांच्या आशीर्वादामुळे आज मी चार जणांचा पॅनल बनवू शकलो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार
प्रभाग क्र ९
अ) ॲड .धम्मराज साळवे
ब)आसमा इम्रान शेख
क) बेबी चंद्रकांत बोचकुरे
ड) ॲड.महेश मासुळकर

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
