Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • हिंजवडी समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट, लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

हिंजवडी समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट, लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप

suwarna gaware 05/12/2025
98e4bd29-cd8c-42ce-b66c-e83302a84230
Spread the love

पिंपरी चिंचवडमध्ये अवजड वाहनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षा ऑडीट करण्याची शासनाकडे मागणी- आमदार जगताप

नागपूर हिवाळी अधिवेशनात विविध लक्षवेधींसह 48 तारांकित प्रश्नांकडे आमदार शंकर जगताप शासनाचे लक्ष वेधणार

अधिवेशन कालावधी कमी असला तरीही शहराचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार- आमदार जगताप

पिंपरी ५ डिसेंबर (प्रतिनिधी) : राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून करणार आहे.

याशिवाय पवना नदी सुधार प्रकल्प, अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योग नगरीतील अघोषित भार नियमांवर उपाययोजना करणे, हिंजवडीमधील आयटीयन्सच्या विविध समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी फास्टट्रॅक लेबर कोर्ट प्रणाली विकसित करणे तसेच हिंजवडीतील विविध समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट स्थापन करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

याशिवाय पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील 48 प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुख्य म्हणजे विविध लक्षवेधींच्या माध्यमातून महत्वाच्या प्रश्नांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे जोरदार मागणी करणार असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. 14 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असून, यामध्ये पिंपरी चिंचवड सह राज्यातील प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील पवना जल सुधार प्रकल्प सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी निधीची तरतूद करून तातडीने पवना सुधार योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी सभागृहाचे लक्ष वेधण्यात येईल असे जगताप म्हणाले. अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आल्याने जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आमदार जगताप म्हणाले.


लक्षवेधी सूचनांद्वारे वेधणार सभागृहाचे लक्ष

पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून करणार आहे.

याशिवाय अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योग नगरीतील अघोषित भार नियमांवर उपाययोजना करणे, हिंजवडीमधील आयटीयन्सच्या विविध समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी फास्टट्रॅक लेबर कोर्ट प्रणाली, पीएमआरडीच्या वतीने लिलावाने विक्री होत असलेल्या भूखंडाला स्थगिती देणे, काळेवाडी हिंजवडी बिजलीनगर या महावितरणच्या शाखा कार्यालयांचे विभाजन करणे, राज्यातील वंचित व मागास समाजातील विद्यार्थ्यांना महाज्योती तर्फे 126 कोटी रुपयांची थकीत छात्रवृत्ति तात्काळ मंजूर करणे.

पिंपरी चिंचवड शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी देखील शासनाकडे करणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रारूप विकास आराखडा नुकताच सादर करण्यात आला.

या प्रारूप विकास आराखड्यामध्ये अनेक चुका आहेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. नागरिक याविषयी वारंवार तक्रारी करत आहेत. यामुळे जनमनाचा आदर राखत हा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा , काळेवाडी रहाटणी परिसरातील विक्रांत वाईन शॉप दारूचे दुकान देशी दारूचे दुकान (CL-III 300) परवाना रद्द करणेबाबतअशी मागणी देखील शासनाकडे करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले आहे.

……

तारांकित प्रश्नांमधून नागरिकांचे प्रश्न सभापटलावर

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायटयांमध्ये लिफ्ट सुरक्षा, इलेक्ट्रिक वाहनांवर टोल माफी करण्याच्या अध्यादेशाचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई , पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या किडनीरोपण रॅकेट चौकशीचा अहवालातील दोषींवर कारवाई, केवायसीचे लाखो अर्ज प्रलंबित असल्याने शिधापत्रकधारकांना होत असलेल्या गैरसोयीबाबत, औंध जिल्हा रुग्णालय येथील एम आर आय सुविधा बंद असल्याबाबत, कुपोषित बालकांच्या पोषक आहार पुरवठ्याची चौकशी बाबत

पिंपरी-चिंचवड मनपाच्या प्रशासनाच्या 4776 जागा रिक्त जागा तातडीने भरण्याकरता सुधारित आकृतिबंध मंजूर करणे, नवीन टीओडी वीजमीटर बाबतच्या तक्रारी दूर करणे , पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी येथील अप्पर तहसीलदार कार्यालयातील कामकाजात होणाऱ्या
दिरंगाईबाबत, वाकड हिंजवडी येथील खटले पौड न्यायालया ऐवजी पिंपरी न्यायालयात वर्ग करणेबाबत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्याबाबत,

राज्यातील प्राध्यापकांची १२ हजारांपेक्षा जास्त रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत, जिल्हा रुग्णालय सांगवी येथील शिवविच्छेदन विभागात फॉरेन्सिक डॉक्टरची तातडीने नेमणूक , पिंपरी पालिकेच्या उद्यान विभागाच्या रस्त्यांच्या दुभाजकामध्ये माती टाकण्याकरिता तब्बल 157 कोटी रुपयाच्या निविदेची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी बाबत

पिंपरीमध्ये अवजड वाहनांद्वारे होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षा ऑडीट करण्याबाबततसेच प्राधिकरणाच्या आरक्षित जागांवरील दीर्घकालीन ताबेदार नागरिकांना मालकी हक्क देण्याकरिता सातबारा व प्रॉपर्टी कार्ड वितरीत करण्याबाबत तारांकित प्रश्न आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केले आहेत.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 41
Tags: #bjp #hiwaliafhiveshan #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’
Next: मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त ते वाहतूक ‘कनेक्टिव्हीटी’साठी 15 मुद्यांवर लक्ष वेधणार!

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.