Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पवना नदीसुधार प्रकल्पाला चालना देण्याचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून प्रशासनाला निर्देश
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पवना नदीसुधार प्रकल्पाला चालना देण्याचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून प्रशासनाला निर्देश

suwarna gaware 28/11/2025
f23e507d-cb14-4e8a-b788-b16ce6de50ba
Spread the love

किवळे, मामुर्डी, रावेत भागात उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्रांची सुविधा पुरवा – आमदार शंकर जगताप

  • कल्पतरू सोसायटी, काळेवाडी एम.के. चौकातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार- आमदार शंकर जगताप*

मिसिंग लिंक भूसंपादन, निधी तरतुदीबाबत प्रशासनाला आमदार शंकर जगताप यांच्याकडून निर्देश

पिंपरी, 28 नोव्हेंबर (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदार संघातील पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी येथे अंडरपास आणि काळेवाडी येथील एम. के. चौक येथे ग्रेड सेपरेटर तयार करून या भागामध्ये वाहतूक सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे.

या रस्त्यांचा आराखडा, आवश्यक भूसंपादन आणि विविध कामांच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि . 28) आमदार शंकर जगताप यांची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर बैठक पार पडली. आगामी काळात हे अंडरपास, ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच या भागातील मिसिंग लिंक जोडून नागरिकांना पर्यायी वाहतूक रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

दरम्यान यावेळी पवना सुधार प्रकल्प, उड्डाणपूल, अंडरपास यांसाठी निधीची तरतूद करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या भागांमध्ये उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्रे, नागरी सुविधा केंद्र विकसित करणे यांसारख्या मुद्द्यांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त दालनामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार शंकर जगताप यांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

याबाबत माहिती देताना आमदार शंकर जगताप म्हणाले चिंचवड मतदार संघातील वाहतुकीची कोंडी, पिंपळे सौदागर पीके चौक येथील उड्डाणपूल, स्वराज्य चौक, काळेवाडी एम के चौक येथील ग्रेड सेपरेटर, तसेच या भागातील रस्ता रुंदीकरण आणि पायाभूत सोयी सुविधांच्या कामाबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी सांगितले, आगामी काळात चिंचवड मतदार संघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्राधान्याने अग्रक्रम दिला जाणार आहे.

पिंपळे गुरव, सौदागर, काळेवाडी, रहाटणी या भागात उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि अंडरपास असे सक्षम पर्याय उभे केले जाणार आहेत. याशिवाय चिंचवड मतदार संघातील मिसिंग लिंक जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये पवना नदीच्या कडेला असणाऱ्या संत गार्डन सोसायटी ते काळेवाडी पुलाकडील 18 मीटर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम 90% पूर्ण झाले आहे.

मोरया स्टेडियमकडून काळेवाडी पुलाकडे जाणाऱ्या 100 मीटर रस्त्याचे काम, मोरया गोसावी क्रीडांगणाकडून काकडे टाऊनशिपकडे जाणाऱ्या 12 मीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. बटरफ्लाय ब्रिजकडून केशवनगर मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या 18 मीटर रस्त्याचे काम, वाकड येथील सर्वे क्रमांक 116 उत्कर्ष चौथी काम अंतिम टप्प्यात आहे. वाकड येथील टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलच्या मागील गोल्ड फिंगर सोसायटी लगतचा भाग जोडल्यानंतर वाहतूक कोंडीचा मुख्य अडथळा दूर होणार आहे.
………

उद्यान, रस्ते व विरंगुळा केंद्रांची नागरिकांना सुविधा द्या

आजच्या बैठकीमध्ये आमदार शंकर जगताप यांनी किवळे, मामुर्डी, रावेत यांसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणाला पुरेशा प्रमाणात मूलभूत सुविधा पुरवणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या भागात आरक्षण विकसित करून नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश आमदार शंकर जगताप यांनी दिले आहेत. यामध्ये उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्र यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
………………………….

पवना नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्याचे निर्देश

पवना नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्याचे निर्देश आजच्या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी महापालिकेला दिले आहेत. शहरातून वाहणारी पवना नदी शहराची आरोग्यवाहिनी आहे. नदीचे आरोग्य सुस्थितीत असणे हे निरोगी शहराचे लक्षण आहे.
त्यामुळे पवना नदी सुधार प्रकल्पाला चालना देण्याचे काम प्राधान्याने हाती घ्या अशी सूचना देखील आमदार जगताप यांनी यावेळी केली. यामध्ये निधीबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू असे देखील आमदारांनी यावेळी सांगितले.

………….

चिंचवड मतदार संघातील विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निर्देश दिले आहेत. मुख्य म्हणजे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागातील उड्डाणपूल, अंडरपास या सुविधांमधून वाहतुकीला सक्षम पर्याय उपलब्ध करणे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यातील 12 मीटर रस्त्यांच्या बाबत असणारे अडथळे दूर करणे, वेगाने विकसित होणाऱ्या भागांमध्ये जास्तीत जास्त उद्याने, चांगले रस्ते, विरंगुळा केंद्र, नागरी सुविधा केंद्र विकसित करून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे यांसारख्या कामांबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

शंकर जगताप
आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर
……..

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 22
Tags: #shankar jagtap #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…
Next: ‘‘सोशल मीडिया’’ सह राजकीय वर्तुळात आमदार महेश लांडगेंचा ‘‘जलवा’’

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.